Bhandara : भंडाऱ्यात महिलेवर अत्याचारनंतर विवस्त्र करून रस्त्यावर फेकले, दोन संशयित आरोपीना पोलिसांनी केली अटक

ज्यावेळी तिथल्या परिसरात ही घटना घडली. त्यावेळी तिथं नागरिक संतप्त झाले होते. तसेच जमलेल्या लोकांनी तात्काळ ही घटना पोलिसांच्या कानावर घेतली.

Bhandara : भंडाऱ्यात महिलेवर अत्याचारनंतर विवस्त्र करून रस्त्यावर फेकले, दोन संशयित आरोपीना पोलिसांनी केली अटक
मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून बनवायचा न्यूड व्हिडीओ, अनेक प्रकरणं उजेडात येताचं महिला हेल्पलाईन चक्रावलं
Image Credit source: TV9 Marathi
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 04, 2022 | 8:50 AM

भंडारा – भंडाऱ्यात (Bhandara) एका 35 वर्षीय विवाहित महिलेवर दोन इसमांनी अत्याचार करीत विवस्त्र करून रस्त्याकाठी फेकल्याची घटना काल उघडकीस आली. पोलिसांनी (Police) या प्रकरणी दोन संशयित आरोपीना अटक केली आहे. दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. कारण हे प्रकरण अत्यंत भयानक असून ज्यावेळी महिलेला रस्त्यावर फेकून देण्यात आले त्यावेळी तिथले नागरिक अधिक संतप्त झाले होते. महिलेची आणि दोन संशयितांची वैद्यकीय चाचणी (Medical test) करण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांना तपास करणं अधिक सुलभ होणार आहे. महिलेने पोलिसांना दोघांनी अत्याचार केल्याची माहिती दिली आहे. महिलेच्या तब्येत बरी नसल्याने त्यांची तब्येत बरी झाल्यानंतर त्यांची नीट चौकशी करण्यात येणार आहे.

महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूरच्या हॉस्पीटलमध्ये दाखल

पीडित महिला ही गोंदिया जिल्हातील राहणारी असून कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान विवस्त्र अवस्थेत नागरिकांना दिसताच पोलिसांनी महिलेला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणी केली असता महिलेवर अत्याचार झाल्याचे उघडकीस येताच महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात करीत पुढील उपचार सुरु आहे. त्यांचा चांगल्या उपचारासाठी नागपुरातील वैद्यकीय महाविद्यलयात हलविले आहे. पीडितेच्या सांगितल्यानुसार कारधा पोलिसांनी दोन संशयित आरोपीना अटक केली असून आरोपी विरुद्ध कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कारधा पोलिस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

घटनेनंतर नागरिक संतप्त

ज्यावेळी तिथल्या परिसरात ही घटना घडली. त्यावेळी तिथं नागरिक संतप्त झाले होते. तसेच जमलेल्या लोकांनी तात्काळ ही घटना पोलिसांच्या कानावर घेतली. तसेच महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी पीडीत पहिलेवरती उपचार सुरु केले आहेत. नागपुरातील वैद्यकीय महाविद्यलयात त्यांचा चांगल्या उपचारासाठी दाखल केले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें