AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार भाड्यानं लावतो सांगत मोठी फसवणूक, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तुमची कार भाड्याने लावतो आणि तुम्हाला दर महिन्याला पैसे देतो, असे सांगून एक टोळी अनेकांना गंडा घालत होती. कार परत न देता कार मालकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. Pimpari Chichawad Police

कार भाड्यानं लावतो सांगत मोठी फसवणूक, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सांकेतिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 7:10 PM
Share

पिंपरी-चिंचवडः पुण्यात फसवणुकीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. आता कार भाड्यानं लावतो सांगत एकानं 1 कोटी 20 लाखांची फसवणूक केली असून, पोलिसांनी आतापर्यंत 16 कार ताब्यात घेतल्यात. तुमची कार भाड्याने लावतो आणि तुम्हाला दर महिन्याला पैसे देतो, असे सांगून एक टोळी अनेकांना गंडा घालत होती. कार परत न देता कार मालकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. (Big Fraud For Renting a Car, Handcuffed By Pimpari Chichawad Police)

सहा जणांच्या या टोळीने तब्बल 16 जणांच्या कार घेतल्या ताब्यात

सहा जणांच्या या टोळीने तब्बल 16 जणांच्या कार अशाच पद्धतीने आमिष दाखवून घेतल्या होत्या. पोलिसांनी या 16 ही कार हस्तगत केल्या असून, त्याची किंमत 1 कोटी 20 लाख रुपये एवढी आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस स्थानकात सुनील राजपाखरे यांनी कल्पेश पंगेकर आणि त्याचा साथीदार नमन सहानी याच्या विरोधात कार घेतल्याचा आणि ती दाखवत नसल्याची तक्रार दाखल केली होती.

पाच जणांच्या साथीने अनेक जणांना फसवल्याचे उघड

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, कल्पेश पंगेकर या मुख्य आरोपीने आणखी पाच जणांच्या साथीने अनेक जणांना फसवल्याचे उघड झालंय. विशेष म्हणजे कल्पेश हा दर 3 महिन्यांला घर बदलत असताना पोलिसांनी त्याला पकडण्यात यश मिळवलंय.

एका तरुणाची 20 हजार रुपयांची फसवणूक (OLX website fraud) केली

गेल्या काही दिवसांपूव्री OLX या वेबसाईटवर आर्मी कर्मचारी (OLX website fraud) असल्याचे सांगून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकारही उघडकीस आले होते. मुंबईतील भायखळा येथे राहणाऱ्या एका तरुणाची 20 हजार रुपयांची फसवणूक (OLX website fraud) केली होती. OLX वेबसाईटवरुन कॅमेरा विकत घेत असताना एका व्यक्तीने मी आर्मी कर्मचारी आहे. आर्मी कॅन्टीनमधून कॅमेरा देतो असे सांगून 20 हजार रुपये घेतले होते. पैसे घेऊनही कॅमेरा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे कळताच भूषण सोनावणे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. भूषण हा एक प्रोफेशनल कॅमेरामन आहे. त्याला त्याच्या कामासाठी एक कॅमेरा हवा होता म्हणून त्यांनी olx वर स्वस्त कॅमेरा घेण्याच ठरवलं आणि शोध सुरू केला. olx वर विक्रम नावाच्या व्यक्तीशी त्याचं यासंदर्भात बोलणं झालं. विक्रमने स्वतःला आर्मी अधिकारी म्हणून भासवून भूषणचा विश्वास संपादन केला आणि त्याच्या कडून टप्याटप्प्याने एकूण 20 हजार रुपये घेतले होते. हे प्रकरणही तेव्हा खूपच चर्चेत आलं होतं.

संबंधित बातम्या

SBI चा 44 कोटी ग्राहकांना सावधानतेचा इशारा, अन्यथा होईल मोठी फसवणूक

कंगना रनौतच्या वैयक्तिक अंगरक्षकाला बेड्या, लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याचा आरोप

Big Fraud For Renting a Car, Handcuffed By Pimpari Chichawad Police

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.