AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लुटीला विरोध, रेल्वे स्टेशनजवळ प्रवाशाची हत्या, तिकीटावर नाव असलेली 15 वर्षांची मुलगी बेपत्ता

प्रवाशासोबत एक कपड्यांनी भरलेली बॅगही होती. विशेष म्हणजे त्याच्याकडे सीवान ते बस्ती या रेल्वे प्रवासाचे 30 ऑगस्ट तारखेचे तिकीटही सापडले आहे. त्यानुसार प्रवासी ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर निघाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

लुटीला विरोध, रेल्वे स्टेशनजवळ प्रवाशाची हत्या, तिकीटावर नाव असलेली 15 वर्षांची मुलगी बेपत्ता
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 10:03 AM
Share

पाटणा : बिहारमधील सीवानमध्ये गुन्हेगारी फोफावताना दिसत आहे. दरोडा, खून आणि चोरीसारख्या घटना सातत्याने समोर येत आहेत. सोमवारी भल्या पहाटे एका प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना रेल्वे स्टेशन परिसरात उघडकीस आली आहे. लुटीला विरोध केल्यामुळे आरोपींनी हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सीवान रेल्वे स्टेशनपासून (Siwan Railway Station) हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मॉर्निंग वॉकला निघालेल्या पादचाऱ्यांनी प्रवाशाला तडफडताना पाहून पोलिसांना याची सूचना दिली, मात्र पोलीस येईपर्यंत त्याने प्राण सोडले होते. धक्कादायक म्हणजे प्रवाशाकडे सापडलेल्या तिकीटावर एका 15 वर्षीय मुलीचंही नाव आहे, मात्र ती जवळपास कुठेच न आढळल्याने भीती व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

स्थानिक लोकांच्या माहितीवरुन सीवान शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणाचा पुढील तपास त्यांनी सुरु केला. प्रवाशाचा गळा, तोंड आणि अन्य भागांतून रक्त येत असल्याचे पाहून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यासोबत एक कपड्यांनी भरलेली बॅगही होती. विशेष म्हणजे त्याच्याकडे सीवान ते बस्ती या रेल्वे प्रवासाचे 30 ऑगस्ट तारखेचे तिकीटही सापडले आहे. त्यानुसार प्रवासी ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर निघाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

15 वर्षांच्या मुलीचा थांगपत्ता नाही

त्याच तिकीटावर 15 वर्षांच्या मुलीचे नाव आहे, मात्र ती घटनास्थळी आढळली नाही. त्यामुळे तिच्याही जीवाचे काही बरे वाईट झाले, ती त्याच्यासोबत आलीच नाही की तिच्यासोबत कुठला अनर्थ घडला, अशी भीती पोलिसांना आहे. मृतासोबत मिळालेल्या तिकिटाच्या आधारे त्याची ओळख पटवण्यात आली आहे. तो बधरिया पोलीस स्टेशन परिसरातील कोइरीगवा येथील रहिवासी दुलारचंद दुखन यादव होता.

पोलिसांवर अकार्यक्षमतेचा आरोप

स्थानिक लोकांनी घटनेबद्दल सांगितले की, काही अज्ञात लोकांनी दरोड्याच्या वेळी चाकूने प्रवाशाची हत्या केली आणि पळून गेले. शहरात क्वचितच पोलिसांची गस्त असते, जर नेहमी पोलिसांची गस्त असती, तर अशी घटना घडली नसती, अशा शब्दात स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. भल्या पहाटे घडलेल्या खुनाच्या या घटनेमुळे लोकांमध्ये संताप आहे.

संबंधित बातम्या :

गाडीतून ऑईल गळती, लहान मुलाने गंडवलं, बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने 50 लाखांची लूट टळली

Axis बँकेचा मॅनेजर, ICICI बँकेचा माजी मॅनेजर, तरीही दरोडा का टाकला?

साताऱ्यातील पैलवानांसह नाशिकच्या तरुणाचा केरळातील बँकेवर दरोडा, साडेसात किलो सोन्याची लूट

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.