AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाला पाच महिनेच झालेले, एकदिवस पतीला अचानक WhatsApp वर मेसेज आला, एकाक्षणात सगळं…

लग्नाला साडेपाच महिनेच झालेले. एकदिवस अचानक पतीला अज्ञात WhatsApp नंबरवरुन मेसेजसह फोटो आला. तो मेसेज वाचल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. असं त्या मेसेजमध्ये काय होतं?.

लग्नाला पाच महिनेच झालेले, एकदिवस पतीला अचानक WhatsApp वर मेसेज आला, एकाक्षणात सगळं...
Marriage Image Credit source: Representative Image
| Updated on: Sep 05, 2025 | 4:51 PM
Share

विवाह हे सात जन्माच बंधन असतं. पण काही लोक या पवित्र नात्याला कलंकीत करण्यात काहीही कसर सोडत नाहीत. लग्न होऊन साडेपाच महिनेच झाले होते. एका महिलेने आपल्या पतीची फसवणूक केली. तिने WhatsApp वर पतीला एक मेसेज पाठवला. Sorry मी माझ्या बॉयफ्रेंडशी लग्न करतेय. हा मेसेज वाचून पतीच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला विश्वासच बसला नाही की, त्याची पत्नी असं सुद्धा काही करु शकते. बिहारच्या मुजफ्फरपुरमधील हे प्रकरण आहे.

नवऱ्याने तात्काळ कुटुंबियांना याची माहिती दिली. त्यावेळी समजलं की, सूनबाई घरातून 53 हजार रुपये रोख कॅश आणि 1.70 लाखाचे दागिने घेऊन घरातून पळाली आहे. हे समजल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसला. लगेचच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केलाय. मिठनपुरा पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे.

अनोळखी नंबरवर फोनवर सतत बोलायची

पीडित युवकाने पोलिसांना सांगितलं की, साहेब! साडेपाच महिन्यापूर्वी माझं लग्न शिवहर येथे राहणाऱ्या युवतीसोबत झालं होतं. सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित होतं. पण पत्नी मागच्या काही दिवसांपासून कुठल्यातरी अनोळखी नंबरवर फोनवर सतत बोलायची. मला त्यावेळी संशय वाटला नाही. मला वाटलं की आपल्या मित्र-मैत्रिणींबद्दल बोलत असेल.

प्लीज तिला शोधून काढा

पीडित व्यक्तीने सांगितलं की, “गुरुवारी पत्नीने मला सांगितलं की, ती क्लब रोडवरील कॉलेजमध्ये जात आहे. मी तिला जाऊ दिलं. रात्र झाली तरी घरी परतली नाही. मला टेन्शन आलं” “मी तिला कॉल केला. पण तिने कॉल उचलला नाही. मी तिचा कुटुंबियांसोबत मिळून शोध सुरु केला. त्यानंतर एका अज्ञात WhatsApp नंबरवरुन मला मेसेज आला. त्यात तिने मला सॉरी लिहिलं होतं. सोबत एका मुलासोबत मला फोटो पाठवलेला. पत्नीने लिहिलेलं की, ती त्या मुलासोबत लग्न करणार आहे” “साहेब, ती माझ्या घरातून दागिने आणि रोकड घेऊन पळाली. प्लीज तिला शोधून काढा” असं आर्जव पीडित पतीने केलं.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.