
एका अल्पवयीन मेहुणीला भोवाजींकडे पाणी मागणं महाग पडलय. मेहुणी आपल्या मैत्रिणींसोबत कुठेतरी चाललेली. त्याचवेळी तिला तहान लागली. समोर भावोजी बसलेले. मेहुणीने भावोजींकडे पाणी मागितलं. आरोप आहे की, मेहुण्याने पाण्यात दारु मिसळून तिला प्यायला दिली. त्यामुळे मुलीला आपल्याभोवती सगळं गरगर फिरतय असं वाटू लागलं. याचाच फायदा उचलून भावोजी तिला निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे भावोजीचे तीन मित्र आधीपासूनच होते. त्यानंतर चौघांनी मिळून मुलीवर सामूहिक बलात्कार केला. बिहारच्या नवादामध्ये ही धक्कादायक घटना घडली.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत छापेमारीची कारवाई सुरु केली. रात्री चौघांपैकी एका आरोपीला अटक केली. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. वारिसलीगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्यावेळी तरुणी मैत्रिणींसोबत लाकडं वेचण्यासाठी गेली होती. त्याचवेळी तिला तहान लागली. तिने तिथेच दारु पिणाऱ्या भावोजींकडे पाणी मागितलं. पीडितेच्या आईचा आरोप आहे की, भावोजी आणि त्याच्या साथीदारांनी पाण्याच्या बहाण्याने तिला जबरदस्ती दारु पाजली. मग, तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
आंटी माहित नाही ती कुठे गेली?
मुलीच्या मैत्रिणींनी तिच्या कुटुंबियांना सांगितलं की, आंटी माहित नाही ती कुठे गेली?. पाणी पिण्यासाठी गेलेली पण परत आली नाही. नातेवाईक घाबरले. त्यांनी शोधाशोध सुरु केली. पीडिता बधार येथे सापडली. लगेच पोलिसांना याची माहिती दिली.
बलात्कार व पॉक्सोच्या अन्य कलमातंर्गत आरोप
पोलिसांनी, मुलीला दारु पाजल्याच्या वृत्ताला नकार दिला आहे. वारिसलीगंज पोलिसांनी सांगितलं की, पीडितेच्या आईच्या अर्जावरुन 13 सप्टेंबरला गुन्हा नोंदवला. या प्रकरणात बलात्कार व पॉक्सोच्या अन्य कलमातंर्गत आरोप लावण्यात आला आहे. एसपीच्या आदेशावरुन एक टीम बनवण्यात आली. एका आरोपीला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आलय. त्याने आपल्यावरील आरोप स्वीकारला आहे.