मुलाने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले, मग जे घडले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल !

मुलाने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. यामुळे नाराज घरच्यांनी आधी मुलाला आणि सुनेला गोड बोलून घरी बोलावले. मग सुनेसोबत जे केले ते माणुसकीला काळिमा फासणारे.

मुलाने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले, मग जे घडले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल !
मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून सुनेला संपवले
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 10, 2023 | 9:25 PM

छपरा : बिहारमधील छपरा येथील पानापूर पोलीस स्टेशन हद्दीतील धेनुकी चावर गावाजवळ 15 दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेच्या मृत्यूबाबत खुलासा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पूजा कुमारी असे मृत महिलेचे नाव आहे, ती गौरा ओपी परिसरातील चांदा गावात राहणारा नितीश कुमार याची पत्नी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मृतदेह सापडल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत होते. तपासाअंती महिलेची तिच्या सासूनेच केल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

शिवचर्चा पाहण्याच्या बहाण्याने सासू सुनेला घेऊन गेली

नितीशने चार वर्षांपूर्वी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध पूजासोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर नितिश आपल्या पत्नीसोबत वेगळ्या ठिकाणी राहत होता. नितिशच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. घरच्यांनी आधी नितिश आणि पूजा दोघांना गोड बोलून घरी बोलावले. मग नितिशची आई आपल्या अन्य मैत्रिणींसोबत पुजाला शिवचर्चा पाहण्यासाठी धनुका गावात घेऊन गेली.

दहा दिवसांनी मृतदेह सापडला

धनुका गावात पुजाची हत्या करुन तिचा मृतदेह चंवर येथील नाल्यात टाकला. पत्नी गायब झाल्याने नितिश तिचा सर्वत्र शोध घेत होता. मात्र तिचा कुठेच पत्ता लागत नव्हता. त्यानंतर दहा दिवसांनंतर पुजाचा मृतदेह पोलिसांना नाल्यात आढळला. यानंतर पोलिसांनी अज्ञात महिलेबाबत तपास सुरु केला. तपासाअंती पोलिसांना महिलेची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच तिने सर्व घटना सांगितली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.