AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिअर घेण्यासाठी आला आणि मोबाईल घेऊन गेला, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला !

एकट्या दुकानदारांना हेरुन वस्तू घेण्याच्या बहाण्याने दुकानात यायचा. मग दुकानदाराला वस्तू काढून देण्यास सांगून त्यांच्या महागड्या वस्तू घेऊन फरार व्हायचा.

बिअर घेण्यासाठी आला आणि मोबाईल घेऊन गेला, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला !
डोंबिवलीत मोबाईल चोर जेरबंदImage Credit source: TV9
| Updated on: Apr 10, 2023 | 5:56 PM
Share

डोंबिवली / सुनील जाधव : एका बिअर शॉपमध्ये बिअर घेण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने दुकान मालकाचा 70 हजाराचा मोबाईल चोरुन पळ काढल्याची घटना डोंबिवली ठाकुर्ली चोळेगाव परिसरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी एका तासात सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा पाठलाग करत ठाकुर्ली परिसरातून बेड्या ठोकल्या. विवेक कुमार श्याम बिहारी श्रीवास्तव असे या आरोपीचे नाव असून, हा आरोपी फिरस्ता आहे. दुकानात दुकानदार एकटा असल्याची संधी साधत दुकानात वस्तू घेण्याच्या बहाण्याने जाऊन दुकानदाराला अवघड ठिकाणी ठेवलेल्या वस्तू देण्यास सांगायचा. मग दुकानदाराची पाठ फिरताच काउंटरवर असलेला दुकानदाराचा मोबाईल आणि अन्य महागड्या वस्तू रोख रक्कम लंपास करायचा.

दुकानदाराचा मोबाईल चोरुन पोबारा

ठाकुर्ली चोळेगाव परिसरात राहणारे पदमाकर चौधरी यांचे लव कुश बिअर शॉप आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानात विवेक कुमार हा बिअर घेण्याच्या बहाण्याने आला होता. त्याने पद्माकर यांची नजर चुकवत काऊंटरवर असलेला त्यांचा 70 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन तेथून पळ काढला. बिअर न घेता ग्राहक परत गेल्याने तसेच काऊंटरवर मोबाईल नसल्याची बाब लक्षात येताच पद्माकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी एका तासात ठोकल्या बेड्या

पोलिसात मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश सानप, विशाल वाघ, नितीन सांगळे यांच्या पथकाने पोलिसांनी चोरीस गेलेल्या मोबाईलचा आणि आरोपीच्या घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज तपासत चोरट्याचा शोध सुरु केला.

एका तासात पोलिसांनी चोरट्याचा ठाकुर्ली परिसरात शोध घेत त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चोरी केलेला 70 हजार रुपये किंमतीचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला. सध्या या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिसांच्या माहितीनुसार हा आरोपी एक सराईत चोरटा असून, दुकानात एकटे असलेल्या दुकानदारांना टार्गेट करायचा. सध्या पोलिसांनी तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आणखी किती ठिकाणी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत?, त्याचा कुणी साथीदार आहे का? याचा तपास रामनगर पोलीस करत आहेत.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.