सुनील माने आणि शिवसेना कनेक्शनची चौकशी करा; भाजपचं एनआयएला पत्रं

| Updated on: Apr 29, 2021 | 4:42 PM

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. (bjp demands probe sunil mane and shiv sena connection)

सुनील माने आणि शिवसेना कनेक्शनची चौकशी करा; भाजपचं एनआयएला पत्रं
पोलीस निरीक्षक सुनील माने
Follow us on

मुंबई: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. भातखळकर यांनी तसे पत्रच एनआयएच्या महासंचालकांना लिहिलं आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (bjp demands probe sunil mane and shiv sena connection)

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांचे बरेच नातेवाईक हे शिवसेनेत सक्रिय असून त्यांची बहीण व त्या बहिणीचे पती हे तर शिवसेनेचे नगरसेवक होते. तसेच सुनील माने यांचा शिवसेनेच्या नेत्यांशी सुद्धा जवळचा संबंध असल्याने त्यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करण्याची करण्यात यावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

पत्रात गंभीर आरोप

मनसुख हिरेन यांना पोलीस अधिकारी तावडे या नावाने कॉल करून घराबाहेर बोलविल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले सुनील माने यांचे शिवसेना कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुनील माने यांची बहीण ही मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथून नगरसेविका होती तर सुनील माने यांच्या बहिणीचे पती हे तर शिवसेनेकडून चार वेळा नगरसेवक होते. इतकेच नव्हे तर सुनील माने यांचा सख्खा भाऊ व त्यावेळी नगरसेवक असलेले त्याच्या बहिणीचे पती यांनी पत्रा चाळीतील नागरिकांना घरे रिकामी करण्यासाठी दमदाटी करण्याचा प्रकार केला होता. त्यात सुनील माने यांचा सुद्धा सहभाग होता. तसेच पीएमसी बँक घोटाळ्यात ज्या शिवसेना नेत्यांना कर्ज मिळाली त्यांच्याशी सुद्धा माने यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करताना माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सुद्धा चौकशी होऊन ‘दूध का दूध और पानी का पानी’ होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच मी एनआयएला पत्र लिहून ही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितलं.

स्फोटक प्रकरणातही सुनील मानेचा सहभाग?

सुनील मानेच्या मोबाईलमधून एक मॅप एनआयएच्या हाती लागला आहे. हा नकाशा प्रियदर्शनी पार्क, चेंबूर ते अँटेलिया परिसरापर्यंतचा आहे, अशी माहितीही एनआयएने दिली. या मॅपमध्ये जो रुट आहे, त्याच मार्गावरुन 24 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी अँटिलिया परिसरात आणून पार्क करण्यात आली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचे अनेक पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. मात्र स्फोटक प्रकरणातही सुनील मानेचा सहभाग आढळतो का, याचा तपास एनआयएकडून सुरु आहे. (bjp demands probe sunil mane and shiv sena connection)

 

संबंधित बातम्या:

विनायक शिंदे नाही, सुनिल मानेचा मनसुख हिरेन यांना हत्येच्या दिवशी फोन, NIA चा दावा

सचिन वाझेनंतर आता सुनील मानेचीही कार जप्त, बोरिवलीतून लाल गाडी NIA च्या ताब्यात

पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी बेड्या

(bjp demands probe sunil mane and shiv sena connection)