नवी मुंबईतील फळमार्केटमध्ये एका गाडीत भीषण स्फोट, परिसरात भीतीचं वातावरण

| Updated on: Jul 05, 2021 | 11:34 PM

फळ मार्केटच्या बहुउद्देशीय इमारतीजवळ MH-43 HD-7598 क्रमांकाची आयशर कंपनीची गाडी उभी करण्यात आली होती. या गाडीत शुक्रवारी रात्री स्फोट झाला. या घटनेमुळं मार्केटच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

नवी मुंबईतील फळमार्केटमध्ये एका गाडीत भीषण स्फोट, परिसरात भीतीचं वातावरण
नवी मुंबईच्या फळ मार्केटमध्ये आयशर गाडीत स्फोट
Follow us on

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये शुक्रवार रात्री 2 वाजता एका मालवाहू गाडीत भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे मार्केट परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. फळ मार्केटच्या बहुउद्देशीय इमारतीजवळ MH-43 HD-7598 क्रमांकाची आयशर कंपनीची गाडी उभी करण्यात आली होती. या गाडीत शुक्रवारी रात्री स्फोट झाला. या घटनेमुळं मार्केटच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. दरम्यान, यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्फोटाचा आवाज एवढा भंयकर होता कि काहीवेळ काय घडले याचा अंदाज बांधणंही कठीण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. (bomb exploded in Tempo at a fruit market in Navi Mumbai)

या भीषण स्फोटात गाडीच्या मागील भागाच्या पूर्ण चिथड्या झाल्या आहेत. जवळपास 25 ते 30 फूट अंतरावर असलेल्या कार्यालयाच्या काचा तडकल्या आहेत. तर गाडी उडवण्याचा प्रकार घडल्याने घटनेपासून वाहतूकदार संघटना कमालीच्या भयभीत झाल्या आहेत. परिसरात अनेक गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. परंतू वेळीच अग्निशामक गाडी आल्याने पुढील दुर्घटना टळली. गाडीत स्फोटक ठेऊन गाडी उडवण्यात आली आहे, असा आरोप गाडीचे चालक राजीव कुमार यादवने दिलीय. एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामगुडे यांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

स्फोट घडवून आणल्याचा गाडी चालकाचा दावा

मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये राजीव कुमार यादव हि व्यक्ती अब्बास नामक व्यक्तीकडे कामाला होती. त्याने काही दिवसांपूर्वी अब्बासकडून गाडी विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गाडीचे पूर्ण पैसे अब्बास यांना देऊनही त्यांनी गाडी माझ्या नावावर केली नसल्याचं राजीव कुमार यादव या गाडी चालकाने सांगितलं. तर अब्बास आणि गाडी चालकामध्ये गेल्या काही दिवसांपासून कुर्ला येथील माल वाहतुकीवरून वाद असल्याचं समजतं. काही दिवसांनी साडे सात लाख रुपयात अब्बास यांनी यादव यांना गाडी विकली होती. एक वर्षभरापूर्वी अब्बास यांचा मुलगा रमझान याने गाडीच्या काचा फोडून चालकाला मारहाण केली होती, अशी माहिती मिळतेय. दरम्यान, त्या दिवशी चालकाने दुपारी 4 वाजता गाडी मार्केटमध्ये उभी केली होती. रात्री दोन वाजता फोन आला कि गाडी जळत आहे. मी येईपर्यंत गाडी पूर्ण जाळून खाक झाली होती. तर बॅटरी, इंजिन आणि इतर पार्टस गाडीचे शाबूत असल्याने हि घटना शॉटसर्किट मुळे घडली नाही तर ती उडवून देण्याचा प्रयत्न झाल्याचं यादवने सांगितलं. गाडीवर बांधण्यात आलेली ताडपत्री व नायलॉन रस्सी जवळपास तीस फूट उंच उडून जाऊन पडली आहे.

मागील 30 वर्षात मार्केटमध्ये अशी घटना कधीच घडली नव्हती. वाहतूकदार संघटनेचा पदाधिकारी म्हणून आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे की, याचा तपास करून वाहन मालकाला त्याचे गाडीचे पैसे भरून मिळावे. शिवाय हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी भीमराव धोत्रे यांनी केली आहे.

इतर बातम्या :

दरोड्यासाठी गावठी कट्टा, कोयता, सुरीचा उपयोग; मनसेच्या पदाधिकाऱ्यासह 4 जणांना बेड्या

इगतपुरीतील रेव्ह पार्टी प्रकरण, 5 आरोपींना जामीन 20 जणांचा जामीन अर्ज फेटाळला, हीना पांचाळचं काय झालं?

bomb exploded in Tempo at a fruit market in Navi Mumbai