अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास ‘एनआयए’ करणार; हिरेनप्रकरण एटीएसकडेच

| Updated on: Mar 08, 2021 | 5:20 PM

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनचा मोठा साठा सापडला होता. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे. (Bomb scare near Antilia: Mansukh Hiren death case transferred to NIA)

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास एनआयए करणार; हिरेनप्रकरण एटीएसकडेच
Follow us on

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनचा मोठा साठा सापडला होता. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे. केंद्र सरकारने तसे आदेशच दिले आहेत. तसेच मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसच करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. (Bomb scare near Antilia: Mansukh Hiren death case transferred to NIA)

अनिल देशमुख यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना ही माहिती दिली आहे. अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनचा साठा सापडला होता. या प्रकरणाचा मुंबई पोलीस व्यवस्थित तपास करत होते. मात्र आता केंद्राने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. तसे आदेशच केंद्राने काढले आहेत. यापूर्वीही केंद्राने सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला होता. 7 महिने झाले. सुशांतसिंगने आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली हे स्पष्ट झालं नाही. आता हा तपास सुद्धा एनआयएने घेतला आहे, असं देशमुख म्हणाले.

हिरेन प्रकरण एटीएसकडेच

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एटीएसच करणार आहे. हिरेन यांच्या गाडीचा तपासही एटीएस करणार असल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलं.

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ संशयित गाडी आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडी सापडली असून घातपाताच्या उद्देशाने ठेवल्याचा संशय आहे. मकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्या आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई क्राईम ब्रँच करत आहे. लवकरच सत्य माहिती समोर येईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी 25 फेब्रुवारीला सापडली होती. 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता.

कोण आहेत मनसुख हिरेन?

मनसुख हिरेन यांनी जे प्रतिज्ञापत्र पोलीसात दाखल केलं आहे आणि विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी जे वाचून दाखवलं त्यानुसार- मनसुख हिरेन हे ऑटोमोबाईलच्या स्पेअर पार्टचा व्यवसाय करत होते. तीन मुलं आणि पत्नीसह ते ठाण्यात रहात होते. पत्नीचं नाव विमला आहे. त्यांचं वय 43 वर्षे. तीनही मुलांची वय हे 13 ते 20 वर्षाच्या दरम्यान आहे. सध्याच्या ठिकाणी ते 2005 सालापासून रहात आहेत.

गाडीचे खरे मालक कोण?

जी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली, तिच्या खऱ्या मालकावरुन वाद आहे. फडणवीसांनी पोलीसांचं जे प्रतिज्ञापत्र सभागृहात वाचून दाखवलं, त्यानुसार हिरेन यांनी संबंधीत गाडी ही 2018 साली सॅम पीटर न्यूटन यांच्याकडून विकत घेतली होती. तर गृहमंत्री देशमुख यांच्या निवेदनानुसार हिरेन हे गाडीचे मुळ मालक नाहीत तर सॅम पीटर न्यूटन हे खरे मालक आहेत. सध्या ती गाडी फक्त हिरेन यांच्या ताब्यात होती. हिरेन यांनी त्या गाडीचं इंटेरिअर डिझानचं काम केलं होतं. त्याचं बिल काही दीड दोन लाख रुपये झाले होते. ते जोपर्यंत दिलं जात नाही तोपर्यंत गाडी परत देणार नाही अशी भूमिका हिरेन यांनी घेतली होती अशी गृहमंत्र्यांची माहिती आहे.  (Bomb scare near Antilia: Mansukh Hiren death case transferred to NIA)

 

संबंधित बातम्या:

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

Video: जिथं ‘त्या’ स्कॉर्पिओच्या मालकानं आत्महत्या केली तिथला व्हिडीओ जशास तसा

मनसुख हिरेनप्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्यामागे काळंबेरं, आम्ही पोलखोल करू; मुख्यमंत्र्यांचा इशारा

(Bomb scare near Antilia: Mansukh Hiren death case transferred to NIA)