एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणीवर प्राणघातक हल्ला, नंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून कॉलेज युवतीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Boy Assault College girl Vasai)

एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणीवर प्राणघातक हल्ला, नंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
vasai boy assault
| Updated on: Mar 16, 2021 | 12:29 PM

वसई : एकतर्फी प्रेमातून कॉलेज युवतीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसईतील एव्हरशाईन परिसरात ही घटना घडली आहे. लग्नासाठी नकार दिल्याने घरात घुसून माथेफिरु तरुणाने तरुणी आणि तिच्या आईवर चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी आणि तिची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे. (Boy Assault College girl due to One Sided Love Case At Vasai)

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईच्या एव्हरशाईन परिसरात एक तरुणी तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती.  सोमवारी (16 मार्च) रात्री पावणे 11 च्या सुमारास आरोपी जितेंद्र ठाकरे हा तिच्या घरी आला होता. यावेळी त्याने तिच्या  पोटाच्या डाव्या कुशीत चाकू मारला. त्यानंतर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या आईच्याही उजव्या हातावर त्याने चाकू मारला.

सध्या त्या दोघींवर वसईच्या प्लॅटिनम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच चाकू हल्ल्यानंतर त्या आरोपीने स्वत: विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोन महिन्यापूर्वी धमकी 

विशेष म्हणजे या तरुणाने पीडित तरुणीला 24 जानेवारी 2021 ला धमकी दिली होती. माझ्याशी लग्न केले नाही तर आई- वडिलांना ठार मारेन, अशी धमकी दिली होती. यानंतर त्या तरुणीने हल्लेखोर तरुणांच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. त्यामुळ हा हल्ला झाला, असा आरोप या तरुणीने केला आहे.

याप्रकरणी सध्या वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. मात्र पोलिसांनी याप्रकरणी माहिती देण्यास नकार दिला आहे.

(Boy Assault College girl due to One Sided Love Case At Vasai)

संबंधित बातम्या : 

चॉकलेटच्या आमिषाने अमरावतीत बालिकेसोबत अतिप्रसंग, नराधमाला बेड्या

मुंबई पोलीस दलातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याची चौकशी होणार; परवानगीसाठी NIA ची गृहमंत्रालयाला विचारणा?

आधी चोरीचा कट रचला, स्वत:च्या घरातील महिलांच्या गळ्याला चाकू लावला, नंतर पोलिसातही धाव, नाटकी महिलेचा भांडाफोड