क्या ‘गेमर’ निकला यार ? प्रेयसीचा प्रियकर इतका हुशार, एक सिमकार्ड आणि लाखो रूपये पसार

| Updated on: May 05, 2023 | 4:49 PM

दोघेही एकमेकांचे मित्र झाले. मैत्री इतकी वाढली की विशाल तिच्या घरी जाऊ लागला. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्या तरुणीच्या घरीही याची कुणकूण लागली. तो हुशार म्हणून त्याची तारीफही होऊ लागली.

क्या गेमर निकला यार ? प्रेयसीचा प्रियकर इतका हुशार, एक सिमकार्ड आणि लाखो रूपये पसार
अनेतिक संबंधातून पत्नीने पतीला संपवले
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

कानपूर : प्रेमासाठी वाट्टेल ते असं सगळेच प्रेमी म्हणत असतात. आपल्या गर्लफ्रेंडसाठी प्रेमी काहीही करायला उत्सुक असतात. सर्वसाधारणपणे असंच पहायला मिळतं. प्रेमासाठी काहीही त्याग करायला प्रेमी तयार असतात. कानपूरच्या गोविंद नगरमध्ये राहणारा विशाल ही असाच वेडा प्रेमी. तिथं तो ऑल-इन-वन नावाचे रेस्टॉरंट चालवत असे. परिसरातील एक तरुणी त्याच्या रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ घेण्यासाठी यायची. यादरम्यान दोघेही एकमेकांचे मित्र झाले. मैत्री इतकी वाढली की विशाल तिच्या घरी जाऊ लागला. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्या तरुणीच्या घरीही याची कुणकूण लागली. तो हुशार म्हणून त्याची तारीफही होऊ लागली.

त्याची ही हुशारी आपणाला कधीतरी गोत्यात आणेल असं त्या तरूणीच्या कधी स्वप्नातही आलं नसेल. पण, जेव्हा कळलं तोपर्यत उशीर झाला होता. झालं असं की, विशाल त्या मुलीला भेटायला तिच्या घरी गेला. आपला मोबाईल खराब झाल्याचे सांगून त्यानं मुलीकडे मोबाईल मागितला. मुलगी वडिलांचाच मोबाईल वापरते हे त्याला माहीत होते.

हे सुद्धा वाचा

विशाल घरी गेला तेव्हा त्याने प्रेयसीकडे माझा फोन खराब झाल्याचे सांगत वडिलांचा फोन मागितला. काही वेळाने त्याने तिला एक कप चहा बनवून आणण्यास सांगितले. प्रेयसी चहा बनवायला जाताच त्याने हळूच मैत्रिणीच्या वडिलांच्या मोबाईलचे सिम काढून ते आपल्या मोबाईलमध्ये टाकले. तर, प्रेयसीच्या वडिलांच्या मोबाईलमध्ये आपल्याकडील ब्लॉक सिम टाकले.

प्रेयसी चहा घेऊन आली तेव्हा तो म्हणाला, तुझ्या वडिलांचा मोबाईल काम करत नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे असे दिसते. त्यानंतर चहा घेऊन विशाल निघून गेला. इकडे प्रेयसीच्या वडिलांनी मोबाईल चालत नाही असे पाहिले. काही प्रॉब्लेम आला असावा असे वाटून दुसऱ्या दिवशी ते मोबाईल घेऊन नेटवर्क कंपनीच्या आऊटलेटवर गेले.

कंपनीने त्यांच्या मोबाईलमध्ये दुसरे सिम असल्याचे सांगत सिम बदलून दिले. दुसरे सिम मोबाईलमध्ये घालताच त्यांना एक मेसेज आला. त्यांच्या खात्यातून लाखो रुपये काढण्यात आल्याचा तो मेसेज होता. तसेच, इंटरनेट बँकिंगद्वारेही खरेदी करण्यात आल्याचा दुसरा मेसेज आला. त्यांनी तात्काळ बँकेत धाव घेतली. तेव्हा आपल्या खात्यातुन व्यवहार झाल्याचे त्यांना कळले.

आपली सायबर फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी गोविंद नगर पोलीस ठाणे गाठले. डीसीपी सलमान ताज यांनी सायबर स्पेशल टीमला माहिती देत शोध मोहिम सुरू केली. तपासात मुलीच्या वडिलांचे सिम अन्य मोबाईलमध्ये वापरल्याचे निष्पन्न झाले. तो मोबाईल नंबर ट्रेस केला असता विशालचे नाव समोर आले.

पोलिसांनी तत्काळ विशालला ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. विशालने प्रेयसीच्या वडिलांच्या मोबाईल नंबरवरून 1,68,000 ची फसवणूक केल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी विशालला अटक केली आहे.