प्रेयसी वारंवार लग्नाचा तगादा लावत होती, मग पुजाऱ्याने जे केले ते पाहून सर्व हादरले !

त्या दोघांचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. दोघांनाही प्रेमाच्या सीमा ओलांडल्या होत्या. ती वारंवार त्याच्याकडे लग्नाची मागणी करत होती. मग पुढे जे घडलं ते भयंकर होते.

प्रेयसी वारंवार लग्नाचा तगादा लावत होती, मग पुजाऱ्याने जे केले ते पाहून सर्व हादरले !
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीसह मुलांना जिवंत जाळले
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jun 10, 2023 | 2:14 PM

हैदराबाद : प्रेयसी वारंवार लग्नाचा तगादा लावत असल्याने एका पुजाऱ्याने तिची हत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह मॅनहोलमध्ये लपवून ठेवला. अप्सरा असे मयत महिलेचे नाव असून, साई कृष्ण असे आरोपीचे नाव आहे. अप्सराच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, अप्सरा गर्भवती होती. साई कृष्णाने तिचा गर्भपातही केला होता. ती लग्नासाठी दबाव टाकत होती, त्यामुळेच ही हत्या झाली असावी. साई कृष्णाचे आधीच लग्न झाले आहे. त्याला एक मूल देखील आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

साई कृष्ण आणि अप्सरा वर्षभरापासून होते रिलेशनसीपमध्ये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमशाबादजवळील नारकुडा गावात राहणारी अप्सरा एका खासगी कंपनीत काम करत होती. तर सूर्य साई कृष्णा हा बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होता. तसेच शरूरनगर भागातील बंगारू मैसम्मा मंदिरात पुजारी म्हणूनही काम करायचा. साई कृष्ण आणि अप्सरा वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील निर्माण झाले होते.

हत्या करुन मृतदेह मॅनहोलमध्ये टाकला

साई कृष्ण 4 जून रोजी तिच्यासोबत सुलतानपल्ली येथील गोशाळेत गेला. तेथे कृष्णाने तिची हत्या केली आणि शरूरनगर एमआरओ कार्यालयाजवळील त्याच्या कारमध्ये मृतदेह नेऊन एका मॅनहोलमध्ये टाकला. मग 5 जून रोजी तो स्वत: आरजीआयए पोलीस ठाण्यात गेला आणि गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी अप्सराचा शोध सुरु केला. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही तपासले. तपासादरम्यान पोलिसांना साई कृष्णवर संशय आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.