चार वर्षांचं प्रेम एका क्षणात संपलं, प्रेयसीचा सूड घेण्यासाठी प्रियकराने उचललं असं पाऊल

| Updated on: Mar 16, 2023 | 9:48 PM

युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं असं बोललं जातं. पण प्रेम मिळालंच नाही तर कोण काय करेल सांगता येत नाही. चार वर्षांच्या प्रेमात दुरावा निर्माण झाल्यानंतर प्रियकराने टोकाचं पाऊल उचललं.

चार वर्षांचं प्रेम एका क्षणात संपलं, प्रेयसीचा सूड घेण्यासाठी प्रियकराने उचललं असं पाऊल
चार वर्षांचं प्रेम एका क्षणात संपलं, प्रेयसीचा सूड घेण्यासाठी प्रियकराने उचललं असं पाऊल
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us on

दिल्ली : आपलं प्रेम मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करणं आणखी सोपं झालं आहे. चॅटिंगद्वारे आपल्या प्रेमाबाबत दुसऱ्या व्यक्तीला सांगता येतं. पण याच सोशल मीडियाचा वापर हल्ली सूड उगवण्यासाठी देखील केला जात आहे. चार वर्ष प्रेमी युगुल रिलेशनशिपमध्ये राहिलं. मात्र नातं तुटताच प्रियकरानं प्रेयसीचा सूड घेण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं. प्रियकराने इन्स्टाग्रामवर बनावट खातं तयार केलं. तसेच प्रेयसी आणि तिच्या वडिलांचे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. प्रेयसीच्या ओळखीच्या लोकांना अश्लील मेसेज केले. त्यामुळे सदर प्रेयसी आणि कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला.

दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, “तरुणीने सांगितलं की अज्ञात व्यक्तीने तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खातं तयार केलं आहे. तिचे आणि तिच्या वडिलांच्या फोटोंचा गैरवापर करत आहे. बनावट खात्याद्वारे नातेवाईकांना अश्लिल मेसेज करत आहे.” या तक्रारीनंतर पोलिासांनी गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचा तपास सुरु केला.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत असताना लक्षात आलं की, आरोपीने फेक अकाउंट तयार करण्यासाठी विवेक नावाच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर वापरला आहे. त्यानंतर समोर आलं की, सदर व्यक्ती पीडित तरुणीचा प्रियकर होता. दोघांमध्ये चार वर्षे प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे प्रियकर चांगलाच संतापला होता.

आरोपी तरुण नजफगढ येथे राहणारा असून प्रेयशीसी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. पण तरुणीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिला बदनाम करण्याचा विडा उचलला. फेक इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून मेसेज पाठवणं सुरु केलं.

पोलिसांनी आरोपी विवेकला दक्षिण पश्चिम दिल्लीतील नजफगञ भागातून अटक केली आहे. त्याचबरोबर त्याच्याकडून मोबाईल हस्तगत केला आहे.