पतीशी मस्करी करणे महागात पडले, पतीने आधी पत्नीला संपवले, मग नवजात बालकाला…

प्रसुती नंतर माहेरुन महिला सासरी परतली. घरी आल्यानंतर पती-पत्नीमध्ये संवाद सुरु होता. महिलेने मस्करीत पतीसमोर नको ते म्हटले, मग पुढे जे घडले ते भयंकर होते.

पतीशी मस्करी करणे महागात पडले, पतीने आधी पत्नीला संपवले, मग नवजात बालकाला...
जमिनीच्या वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 2:32 PM

हैदराबाद : पतीसोबत मस्करी करणे एका महिलेला महागात पडले आहे. मस्करीनंतर संतापलेल्या पतीने पत्नी आणि 43 दिवसांच्या अर्भकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुहेरी हत्याकांडाची घटना हैदराबादमधील अब्दुल्लापूरमेटच्या अनाजपूर गावात दुपारी दीडच्या सुमारास घडली. पत्नी आणि बाळाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाय धनराज असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पतीला मस्करीत म्हणाली…

घटनेच्या दिवशीच दुपारी प्रसूती झाल्यानंतर आई-वडिलांच्या घरुन महिला पतीच्या घरी परतली होती. पत्नीने पतीला मस्करीत हा त्याचा मुलगा नसल्याचे म्हटले. यानंतर धनराज संतापला आणि पती-पत्नीमध्ये वाद सुरु झाला. वाद इतका विकोपाला गेला की, धनराजने पत्नीवर बिअरची बाटली आणि कुऱ्हाडीने वार करुन तिची हत्या केली. यानंतर नवजात मुलाला घरातील नालीत फेकले.

कुटुंबीयांकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याचा दावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. धनराज हा मजुरीचे काम करतो. बुधवारी दुपारी दाम्पत्याच्या मोठ्या मुलीने वडिलांना घरात आईला मारहाण करताना पाहिले. यानंतर तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. तिने दुसऱ्या अल्पवयीन मुलाला सावध केल्यानंतर त्याने ही बाब गावातील ज्येष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र लोकं घरी पोहोचेपर्यंत त्याने दोघांनाही ठार केले होते. महिलेच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी तिचा छळ होत असल्याचा आरोप केला आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपी धनराजची चौकशी केली त्यांना सांगितले की, तो आपल्या पत्नीवर रागावला होता, कारण ती कथितपणे हा त्याचा जैविक मुलगा नसल्याचा दावा करत होती. हा मुलगा धनराजचा मुलगा असल्याचे तिला माहीत होते तरी तिने वारंवार चिथावणी दिल्यामुळे तो चिडला, असे त्याने पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्याने पत्नी आणि मुलाची हत्या केली.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.