VIDEO | महिलेनं वरमाईच्या अंगावर भाजी सांडली, दबा धरुन बसलेल्या चोरट्यानं डाव साधला, लग्न सोहळ्यातून 4 लाखांचे दागिने पळवले

नांदेडमध्ये (Nanded) एका लग्न सोहळ्यातून (Wedding) 4 लाख रुपये किंमतीचे वधुचे दागिने चोरट्याने (Jewellery Steal) लंपास केल्याची घटना घडलीये. या घटनेचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या चोरट्याचा शोध घेत आहेत.

VIDEO | महिलेनं वरमाईच्या अंगावर भाजी सांडली, दबा धरुन बसलेल्या चोरट्यानं डाव साधला, लग्न सोहळ्यातून 4 लाखांचे दागिने पळवले
Nanded Robbery
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 10:54 AM

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) एका लग्न सोहळ्यातून (Wedding) 4 लाख रुपये किंमतीचे वधुचे दागिने चोरट्याने (Jewellery Steal) लंपास केल्याची घटना घडलीये. या घटनेचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या चोरट्याचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

नांदेडमध्ये एक लग्न सोहळा सुरु होता. लग्न पार पडल्यानंतर इतर विधीसाठी वधूने आपले दागिने काढून नावरदेवाच्या आईकडे दिले होते. नवरदेवाची आई आपल्या पर्समध्ये दागिने ठेवून जेवणासाठी टेबलकडे गेली. त्याचवेळी एका महिलेने त्यांच्या अंगावर तिच्या ताटातील भाजी सांडली.

भाजी पुसत असतांना नावरदेवाच्या आईने पर्स बाजूला ठेवली. याच संधीचा फायदा घेत एका मुलाने पर्स घेऊन पळ काढला. हा मुलगा सेसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या चोरट्या मुलाच्या अंगावर लग्नात शोभेल असा चांगला ड्रेस होता, त्यामुळे त्याच्या हालचालीवर कुणालाही शंका आली नाही.

या मुलासोबत त्याच्या टोळीतील इतर सदस्य लग्नकार्यात असावेत असा संशय आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

पाहा या घटनेचा व्हिडीओ – 

संबंधित बातम्या :

Pimpri-Chinchwad crime| आर्यन खान प्रकरण; पंच किरण गोसावीला भोसरी पोलिसांनी केली अटक  

वर्चस्ववादातून रक्तचरित्र, उद्योगनगरी नाशिकमध्ये खुनामागून खून; डोक्यात दगड घालून तरुणाला संपवले