AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भावासोबत “अफेअर”चा संशय, उद्यानातच सर्वांसमोर तरुणीला बदडलं..

छत्रपती संभाजीनगरमधील एका उद्यानात एका तरुणीवर तिघींनी बेदम मारहाण केली. भावासोबतच्या प्रेमसंबंधाच्या संशयामुळे हा प्रकार घडला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची पोलिसात तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती नाही, त्यामुळे आणखी संताप व्यक्त होत आहे. आजूबाजूला मुले असतानाही हा प्रकार घडला, याने सर्वांना धक्का बसला आहे.

भावासोबत अफेअरचा संशय, उद्यानातच सर्वांसमोर तरुणीला बदडलं..
उद्यानात महिलांनी तरूणीला बदडलंImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 19, 2025 | 1:38 PM
Share

छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भावासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आल्याने तीन महिलांनी एका तरूणीला उद्यानातच बदडलं. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. त्या पार्कमध्ये आजूबाजूला मुलं खेळत होती, तरीही त्या बायकांनी त्या तरूणीला धरून मारलं, तिचे केस ओढले आणि शिवीगाळही केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र याप्रकरणी, सिडको पोलिस ठाण्यात सोमवारी संध्याकाळपर्यंत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एन-११ मधील सार्वजनिक उद्यानात दुपारी ही घटना घडली. अंदाजे 25 वर्षांची तरुणी रविवारी एन-११ च्या सुदर्शननगरमधील एका उद्यानात बसलेली होती. तेवढ्यात तीन महिला तिचा पाठलाग करत तिथे आल्या आणि त्यांनी तिला त्या पार्कमध्येच गाठलं. आजूबाजूला एवढी लोकं होती, लहान मुलंही खेळत होती तरी त्या महिलांनी अचानक तिच्यावर हल्ला चढवला. तसेच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

हल्ल्यामुळे घाबरलेली तरूणी त्यांना मारहाण न करण्यासाठी विनवण्या करत होती. मात्र, तीनही संतप्त महिलांनी तिचे केस खेचले, तसेच तिला जमिनीवर पाडून बेदम मारहाण केली, तिला लाथाबुक्क्यांनी अक्षरश: तुडवलं. माझ्या भावाचा नाद सोड, अशी धमकी देत शिवीगाळ केली.

मारहाण करणाऱ्यांमध्ये तरुणाची आई, काकू असल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला. शिवाय मुलीपायी मुलाने आईलाच सुनावल्याने हा वाद टोकाला गेल्याचे समजतं. त्यातून तीन महिलांनी मिळून मुलीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला तरी सिडको पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळपर्यंत या घटनेप्रकरणी कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल