AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldana Road Accident : साखरपुड्यासाठी जात असताना काळाचा घाला! ट्रॅव्हल्स-अल्टोची जोरदार धडक, 3 ठार

साखरपुड्यासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला. मेहकर-डोनगाव रोडवर ही घटना घडली.

Buldana Road Accident : साखरपुड्यासाठी जात असताना काळाचा घाला! ट्रॅव्हल्स-अल्टोची जोरदार धडक, 3 ठार
अल्टो कारचा अपघातात चक्काचूरImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Apr 23, 2022 | 1:50 PM
Share

बुलडाणा : साखरपुड्यासाठी जात असलेल्यांवर काळानं घाला घातलाय. मारुती सुझुकीची अल्टो कार आणि एक ट्रॅव्हल्सची बस (Alto car & travel’s bus Accident) यांचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू (3 people killed) झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. भीषण अपघाताच्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. जखमींना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मेहकर आणि डोनगाव रोडवर (Buldana Mehkar  and Dongaon Road) हा भीषण अपघात घडला. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेले सगळेजण चाळीसगावातील असल्याची माहिती मिळतेय. अपघाता मृत्यू झालेल्या सर्व जण चाळीसगावमधील असल्याची माहिती मिळतेय. दिग्रसाल इथं साखरपुड्यासाठी हे लोक चालले होते. त्यावेळी हा अपघात झाला. अपघातातील मृतांची नावं कळू शकलेली नाहीत.

नागपूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघे ठार झाल्यात. तर 3 जण गंभीर जखमी झालेत. ट्रॅव्हल्स बस आणि अल्टो कार मध्ये हा अपघात झाला. नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने जाणारी MH 40 BL 7061 ट्रॅव्हल्स अल्टो कारला धडकली. MH 06 5134 क्रमांकाची अल्टो कार चाळीसगाववरुन डीग्रसला जात होती. मात्र शनिवारी सकाळी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहराजवळ या दोन्ही गाड्याची समोरा समोर जोरदार धडक झाली.

या अपघातामध्ये इंदल चव्हाण, योगेश विसपुते आणि विशाल विसपुते या तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर ज्ञानेश्वर चव्हाण आणि मिथुन चव्हाणसह आणखी एक जण युवक जखमी झाला. जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार नंतर औरंगाबाद येथे उपचारसाठी हलविण्यात आलं. अल्टो कार मधील 5 नातेवाईक डीग्रसला साखरपुडा करण्यासाठी जात असताना हा अपघात घडला.

अपघातामधील मृतांची नावं

1) इंदल चव्हान ..वय 38 2) योगेश विसपुते, वय..32 3) विषाल विसपुते..वय.38

3 दिवसांतला दुसरा अपघात

तीन दिवसांपूर्वीच बुलडाण्यात भीषण अपघात झाला होता. त्याही वेळी तिघांचा मृत्यू झाला होता. बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मलकापूर शहराजवळ कंटेनर ट्रक आणि प्रवाशी ऑटोमध्ये समोरासमोर आल्यानं भीषण अपघात झाला होता. या अपघातात 3 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला होता.

वाढत्या अपघातांना रोखण्याचं आव्हान

दरम्यान, वाढते रस्ते अपघात थांबवायचे असे, असा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होतोय. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात वाढलेल्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जातेय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रस्ते अपघातात होणाऱ्या बळींची संख्या ही चिंतेचा विषय असल्याचं संसदेत बोलताना म्हटलं होतं. दरम्यान, राज्यातील रस्ते अपघात थांबायचं नाव घेत नसल्यांचं बुलडाण्यातील अपघातामळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार