AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थकलेले मजूर गाढ झोपले, तेवढ्यात भरधाव ट्रक आला आणि एकच कल्लोळ उठला… कुठे घडली ही दुर्दैवी घटना ?

पहाटेच्या सुमारास भरधाव आलेल्या ट्रकने गाढ झोपलेल्या मजुरांना चिरडले. आणि एकच कल्लोळ उठला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

थकलेले मजूर गाढ झोपले, तेवढ्यात भरधाव ट्रक आला आणि एकच कल्लोळ उठला... कुठे घडली ही दुर्दैवी घटना  ?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 02, 2023 | 11:07 AM
Share

गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा | 2 ऑक्टोबर 2023 : राज्यातील अपघातांचे सत्र सुरूच असून बुलढाण्यातही असाच एक दुर्दैवी अपघात घडला आहे. दिवसभराच मरमर कष्ट करून, मेहनत करून रस्त्याच्या कडेला गाढ झोपलेल्या मजुरांची ती झोप अखेरचीच ठरली. भरधाव वेगाने आलेला ट्रक झोपडीत घुसल्याने भीषण अपघात (accident) झाला. या घटनेत १० हून अधिक मजूर चिरडले गेले. त्यापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावाजवळ मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. हे काम उत्तम रितीने पार पडावे, चांगला रस्ता व्हावा यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोरगड येथील मजूर रात्रंदिवस घाम गाळून मेहनत करत आहेत. दिवसभराचे काम संपवून रविवारी अनेक मजूर रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या कडेला टीनशेडमध्ये झोपले. मात्र ती रात्र अखेरची ठरेल याची कल्पना कोणालाच नव्हती.

सोमवारी पहाटे 5:30 च्या सुमारास एक ट्रक भरधाव वेगाने आला आणि त्या टीनशेडमध्ये घुसला. त्या ट्रकखाली काही मजूर चिरडले गेले. त्यापैकी चौघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर उर्वरित नऊ जण गंभीर जखमी झाली असून त्यांना उपाचारांसाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या अपघातानंतर ट्रकचालक ट्रक तेथेच सोडून फरार झाला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत असून चालकाचाही शोध सुरू आहे.

प्रकाश मकु धांडेकर (वय 26), पंकज तुळशीराम जांबेकर (वय 19), राजाराम दादू जांबेकर (वय 35) आणि अभिषेक जांबेकर (वय 18) अशी मृतांची नावे असून ते सर्वजण मोरगड येथील रहिवासी आहेत.

तर दीपक पणजी बेलसरे, कमल रमेश जांभेकर, अमर बजू , शाम भास्कर, गुणी भुया भोगर भुया, अक्षय कुमार, सतपाल कुमार मलिकचंद, महेश मोची , आशिष कुमार निर्मल भुयार हे अमरावती व इतर राज्यातून आलेले काही मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मलकापूर येथे उपचार सुरू आहेत.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.