तुम्ही खरेदी केलेली बुलेट चोरीची तर नाही?

चोरट्यांकडून थोड्याथोडक्या नव्हे तर 44 बुलेट आणि सुझुकी मोटार कार असा 1 कोटी, 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तुम्ही खरेदी केलेली बुलेट चोरीची तर नाही?
बुलेट चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

नवी मुंबई : बुलेट चोरी करुन (Bullet bike thief arrested in Navi Mumbai) त्याची बनावट कागदपत्रे बनवून विक्री करणारी टोळी, नवी मुंबई गुन्हे शाखेने पकडली आहे. या चोरट्यांकडून थोड्याथोडक्या नव्हे तर 44 बुलेट आणि सुझुकी मोटार कार असा 1 कोटी, 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने तब्बल 64 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. (Bullet thief arrested in Navi Mumbai)

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बुलेट चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग आणि अप्पर पोलीस आयुक्त डॉ.बी.जी शेखर पाटील यांनी बुलेट चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी चक्र फिरवली. या टोळीची कुणकुण लागताच, पोलिसांनी आपलं जाळं टाकून या टोळीला अलगद उचललं. पोलिसांनी ही टोळी कार्यरत असलेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

त्यानंतर वेगवेगळी चार पोलीस पथके तयार करून, या टोळीतील, सोहेल शेख (28) आणि सौरभ मिलिंद करंजे (23) यांना वाशीमधून ताब्यात घेतले. तर यांचा साथीदार अमोल शिवाजी ढोबळे (35) याला महापे येथून अटक केले. यातील अमोल ढोबळे हा अट्टल चोर आहे. या टोळीने चोरी केलेल्या 44 बुलेट आणि सुझुकी मोटार कार असा 1कोटी, 30 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. व आणखी 64 गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.

पिंपरीतही बुलेट चोरांच्या मुसक्या आवळल्या

दरम्यान, नुकतंच बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशाल मगर, विशाल खैरे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 13 बुलेट आणि दोन अन्य महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. हा सर्व मुद्देमाल 20 लाख 50 हजारांचा आहे.

संबंधित बातम्या 

पिंपरी चिंचवडमध्ये बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना अटक, 13 बुलेटसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त 

Published On - 6:38 pm, Fri, 29 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI