AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी चिंचवडमध्ये बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना अटक, 13 बुलेटसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. (Pimpri-Chinchwad Two People arrest stealing bullets)

पिंपरी चिंचवडमध्ये बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना अटक, 13 बुलेटसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
| Updated on: Jan 25, 2021 | 10:59 PM
Share

पिंपरी चिंचवड : बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. विशाल मगर, विशाल खैरे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 13 बुलेट आणि दोन अन्य महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. हा सर्व मुद्देमाल 20 लाख 50 हजारांचा आहे. (Pimpri-Chinchwad Two People arrest stealing bullets)

पिंपरी चिंचवडमध्ये वाहन चोरींच्या घटनेत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहन चोरांची माहिती काढण्यास सुरुवात केली. यानंतर वाहन चोरी झालेल्या घटनास्थळावरुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे माहिती काढण्यात आली. त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल ढोबळे हा बुलेट मोटरसायकल चोरी करत असल्याचे समोर आले.

काही दिवसांपूर्वी अमोल याने चोरलेली एक बुलेट दुचाकी विकण्यासाठी त्याचे दोन साथीदार पिंपरी चिंचवड मधील मोशी टोलनाका परिसरामध्ये येणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. या सापळ्यात हे आरोपी विशाल मगर आणि विशाल खैरे अडकले.

यानंतर पोलिसांनी आरोपी विशाल मगर आणि विशाल खैरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक बुलेट आढळली. याप्रकरणाचा अधिक तपास केला असता ती बुलेट त्यांचा मित्र अमोल ढोबळे याने चोरी करुन त्यांना विक्रीसाठी दिली. अमोल ढोबळे याने आतापर्यंत 12 बुलेट मोटरसायकल आणि इतर दोन मोटर सायकल जामखेड येथे विक्रीकरीता ठेवल्याचेही आरोपींना सांगितले.

या चोरांनी पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा, नवी मुंबई, ठाणे परिसरातून गाडींच्या चोरी केली होती. यानंतर चोरुन आणून विक्रीसाठी ठेवलेल्या 13 बुलेट मोटरसायकल आणि एक अपाची मोटर सायकल, एक अॅक्टिवा मोपेड जप्त केल्या आहेत. हा सर्व मुद्देमाल एकूण 20 लाख 50 हजार रुपये इतका आहे. या दोन्ही आरोपींवर इतर ही अनेक गुन्हे असल्याचे समोर आलं आहे.  (Pimpri-Chinchwad Two People arrest stealing bullet)

संबंधित बातम्या : 

मामी आणि चुलत मामाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, दहा वर्षांच्या भाच्याची हत्या

मुख्याध्यापक दाम्पत्याकडून पोटच्या मुलींची डंबेल्सने हत्या, सूर्योदयाला लेकी पुन्हा जिवंत होण्याची ‘अंधश्रद्धा’

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.