मामी आणि चुलत मामाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, दहा वर्षांच्या भाच्याची हत्या

मामी आणि तिच्या चुलत दीराचे जवळपास दहा वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. मात्र आपले संबंध उघड होण्याच्या धास्तीने दोघांनी भाच्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. (Woman kills nephew with boyfriend)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:48 PM, 25 Jan 2021
मामी आणि चुलत मामाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, दहा वर्षांच्या भाच्याची हत्या

रांची : मामी आणि चुलत मामाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने दहा वर्षांच्या भाच्याला जीव गमवावा लागला. विवाहबाह्य संबंध उघड होण्याच्या भीतीने मामीने बालकाची निर्घृण हत्या केली. झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Woman kills 10 years old nephew after he catches him red handed with boyfriend)

दहा वर्षांचा चिमुकला आपल्या आजीच्या घरी राहायला आला होता. तिथे त्याने आपल्या मामीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. तिचा प्रियकर म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नाही, तिच्या पतीचा चुलतभाऊ होता.

दहा वर्षांपासून विवाहबाह्य संबंध

भाचा आपल्या संबंधांविषयी आपला पती आणि इतर नातेवाईकांना सांगेल, अशी भीती मामीला सतावत होती. मामी आणि तिच्या चुलत दीराचे जवळपास दहा वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. मात्र आपले संबंध उघड होण्याची धास्ती मामीला वाटत होती. त्यामुळे दोघांनी भाच्याचा काटा कायमस्वरुपी काढण्याचा निर्णय घेतला.

गळा दाबून चिमुरड्याला विहिरीत फेकलं

आरोपी मामी आणि चुलत मामाने भाच्याला फूस लावून आपल्या खोलीत बोलावून घेतले. त्यानंतर चिमुरड्याचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह विहिरीत फेकला. मुलगा घरातून बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीय चक्रावून गेले. झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील मेहरमा ब्लॉकमधील बेलबड्डा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सीमानपुरी गावात ही घटना घडली. (Woman kills 10 years old nephew after he catches him red handed with boyfriend)

मामीच्या वागण्यामुळे संशय बळावला

चिमुरडा बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कुटुंबातील सर्व नातेवाईकांची चौकशी सुरु केली. मामीच्या बोलण्यावरुनच पोलिसांना तिच्यावर संशय आला होता. पोलिसांनी मामीसह चुलत दीराची कसून चौकशी केली, तेव्हा दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला.

तपास अधिकारी एसडीपीओ कामेश्वर कुमार सिंह यांनी सांगितलं की दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे आरोपपत्र मजबूत झाले आहे. दोन्ही आरोपींना तुरुंगात पाठवण्याची कारवाई केली जात आहे.

संबंधित बातम्या :

मुख्याध्यापक दाम्पत्याकडून पोटच्या मुलींची डंबेल्सने हत्या, सूर्योदयाला लेकी पुन्हा जिवंत होण्याची ‘अंधश्रद्धा’

निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या; आत्महत्येचं कारण वाचून हादराल

(Woman kills 10 years old nephew after he catches him red handed with boyfriend)