वाढदिवशी जोशात नंग्या तलवारी नाचवल्या, बुलडाण्यात नगरपरिषद उपाध्यक्षांसह सहा जणांवर गुन्हा

| Updated on: Feb 12, 2021 | 11:30 AM

मलकापुरात नंग्या तलवारी नाचवल्या प्रकरणी नगर परिषद उपाध्यध्य हाजी रशीद खांसह सहा जणांना जेलची हवा खावी लागली आहे.

वाढदिवशी जोशात नंग्या तलवारी नाचवल्या, बुलडाण्यात नगरपरिषद उपाध्यक्षांसह सहा जणांवर गुन्हा
Buldhana Sword
Follow us on

बुलडाणा : मलकापुरात नंग्या तलवारी नाचवल्या प्रकरणी नगर परिषद उपाध्यक्ष (Showing Swords In Birthday Celebration) हाजी रशीद खांसह सहा जणांना जेलची हवा खावी लागली आहे (Showing Swords In Birthday Celebration).

वाढदिवस साजरा करणे आणि त्यामध्ये सर्रासपणे अल्पसंख्यांक युवकांनी सर्व नेत्यांच्या देखत नंग्या तलवारी नाचवणे मलकापूर नगरपरिषदचे उपाध्यक्ष हाजी रशीद खां जमादार यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता थेट त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नगर परिषद उपाध्यक्ष, नगरसेवक आणि इतर चार युवकांना याप्रकरणी जेलची हवा खावी लागली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. या 6 आरोपींना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुणावली आहे.

Buldhana Sword

मलकापूर नगरपरिषद उपाध्यक्षाच्या वाढदिवशी नंग्या तलवारी नाचवल्या

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष, शांतता समिती सदस्य, मलकापूर नगरपरिषद उपाध्यक्ष असलेले हाजी रशीद खां जमादार यांचा 10 फेब्रुवारीला वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नगरपरिषद उर्दू शाळेच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमावेळी अल्पसख्यांक युवकांनी नंग्या तलवारी नाचविल्या आणि नारेबाजी केली होती.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे इतर नेतेही उपस्थित होते. तलवारी नाचवितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाने पोलीस विभागाची लक्तरे वेशीवर टांगल्याने सुज्ज्ञ नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते (Showing Swords In Birthday Celebration).

सहा जणांना पोलीस कोठडी

त्यानंतर पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्यांना 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नगरपरिषद उपाध्यक्ष हाजी रशीद खां जमादार, आयोजक तथा नगरसेवक अॅडव्होकेट जावेद कुरेशीसह इतर 4 युवकांचा समावेश आहे.

Showing Swords In Birthday Celebration

संबंधित बातम्या :

आठ जणांची नावं लिहून सांगलीत सराफाची आत्महत्या

कोल्हापुरात राजाराम तलावाजवळ आढळलेल्या वृद्धेच्या छिन्नविच्छिन्न मृतदेहाचं गूढ उकललं

परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक