कोल्हापुरात राजाराम तलावाजवळ आढळलेल्या वृद्धेच्या छिन्नविच्छिन्न मृतदेहाचं गूढ उकललं

(Kolhapur Lady Dead Body Mystery)

कोल्हापुरात राजाराम तलावाजवळ आढळलेल्या वृद्धेच्या छिन्नविच्छिन्न मृतदेहाचं गूढ उकललं
कोल्हापुरात दागिनांच्या लुटीच्या उद्देशाने महिलेची हत्या
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 9:15 AM

कोल्हापूर : कोल्हापुरातील राजाराम तलावाजवळ छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाबाबत उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सोन्याचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने वृद्धेची हत्या झाल्याचं पोलिस तपासात उघड झालं. हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Kolhapur Senior Citizen Lady Dead Body Mystery Solved)

कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरात वृद्ध महिलेचा अर्धवट मृतदेह काल मिळाला होता. छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. मात्र या हत्याकांडाचा कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावला. दहा तोळे दागिने लुटण्याचा बहाण्याने वृद्धेचा खून केल्याचं उघडकीस आलं. शांताबाई आगळे असं मृत वृद्धेचं नाव आहे. हत्येप्रकरणी संतोष परीट या तरुणाला पोलिसांनी अटक केली.

गोकुळ शुगरच्या अध्यक्षांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला

गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांचा मृतदेह दोनच दिवसांपूर्वी रेल्वे रुळावर आढळला होता. शिंदे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन होते. भगवान शिंदेंनी आत्महत्या केल्याचं बोललं जातं.

सोलापुरातील मोदी स्मशानभूमी लगत असलेल्या रेल्वे रुळावर भगवान शिंदेंचा मृतदेह आढळला होता. गोकुळ शुगरचे चेअरमन असलेले भगवान शिंदे नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मोदी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पुलावरुन खाली पडल्याने छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. संबंधित मृतदेह हा भगवान शिंदे यांचा असल्याची नातेवाईकांनी खात्री केली.

कर्नाटक विधानपरिषद उपसभापतींचाही मृतदेह

कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती एसएल धर्मेगौडा यांचा मृतदेह डिसेंबर महिन्याच्या अखेरीस रेल्वे रुळांवर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दक्षिण कर्नाटकातील चिकमगळुर या धर्मेगौडांच्या मूळगावात हा प्रकार घडला होता. एसएल धर्मेगौडा यांची सुसाईड नोट सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यांच्या निधनाच्या अवघ्या 15 दिवसांपूर्वी कर्नाटक विधानपरिषदेत झालेल्या राड्यात चार आमदारांनी धरत उपसभापतींना खुर्चीतून खाली खेचल्याचं पाहायला मिळालं होतं.

संबंधित बातम्या 

गोकुळ शुगरचे अध्यक्ष भगवान शिंदे यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला

Karnataka विधानपरिषदेत आमदारांनी खुर्चीवरुन खेचलेले उपसभापती रेल्वे रुळांवर मृतावस्थेत

(Kolhapur Senior Citizen Lady Dead Body Mystery Solved)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.