AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएफआय संघटनेची व्याप्ती वाढतीच, मालेगावमध्ये एटीएसची पुन्हा एकदा मोठी कारवाई !

सप्टेंबर महिन्यात झालेल्या कारवाई टेरर फंडिंगप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने रविवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेचा माजी जिल्हाध्यक्ष मौलाना इरफान दौलत नदवीला अटक केली.

पीएफआय संघटनेची व्याप्ती वाढतीच, मालेगावमध्ये एटीएसची पुन्हा एकदा मोठी कारवाई !
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Nov 14, 2022 | 3:53 PM
Share

नाशिक : मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्र एटीएसकडून पीएफआयच्या संबंधित कारवाई सुरूच असून नुकतीच मालेगावमध्ये आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. मालेगावातून इमाम कौन्सिलचा अध्यक्षाला एटीएसच्या पथकाने अटक केली आहे. मौलाना इरफान नदवी असे संशयित व्यक्तीचे नाव असून त्यास मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यात पीएफआय संघटनेची पाळेमुळे रुजल्याचे या प्रकरणावरून दिसून येत असून सातत्याने कारवाया होत असल्याने मालेगावमध्ये खळबळ उडाली आहे. पीएफआय आणि मालेगाव कनेक्शन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या एटीएसच्या कारवाईत मालेगावमध्ये एक मोठी कारवाई झाली होती. पीएफआयच्या संदर्भात अनेक धक्कादायक पुरावे हाती लागल्याने खळबळ उडाली होती. देशाच्या विरोधात कट रचणे, राममंदिर पाडणे यांसारख्या बाबी समोर आल्या होत्या, त्यामुळे एटीएसकडून आणखी सखोल तपास केला जात असून आज पुन्हा एकाला एटीएसने अटक केली आहे.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या कारवाई टेरर फंडिंगप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने रविवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेचा माजी जिल्हाध्यक्ष मौलाना इरफान दौलत नदवीला अटक केली.

शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली असून नुकतेच त्याला न्यायालयात हजर केले होते, त्याच्या विरोधात सबळ पुरावे हाती लागल्याने त्याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

देशाच्या गृहविभागाने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली असून देशभरात विविध पदाधिकारी यांच्या विरोधात ही कारवाई केली जात असून एटीएसची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

यापूर्वी मालेगाव येथून अटक केलेल्या यादीत मौलाना सहेफू रहेमान सईद अहमद याचा समावेश होता, त्यावरून संपूर्ण राज्यभर या कारवाईच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.

सप्टेंबरमध्ये झालेल्या कारवाईत मौलाना नदवी आणि सादेन शाहिद इक्बाल अन्सारी यांना अटक करण्यात आली होती, त्यावेळी नदवी याला सोडून देण्यात आले होते.

मात्र, तपासा दरम्यान नदवी याचाही सहभाग दिसून आल्याने शनिवारी पुन्हा एटीएस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून मालेगाव आणि पीएफआय कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी