पैशांवरुन वादातून डोक्यात फरशी घातली, सासऱ्याकडून सूनेची हत्या

पैशांवरुन वादातून डोक्यात फरशी घातली, सासऱ्याकडून सूनेची हत्या
चंद्रपुरात सासऱ्यांकडून सुनेची हत्या

32 वर्षीय गीता कन्नाके यांची हत्या करण्यात आली. रात्री पैशांवरुन सासरा-सुनेत वाद झाला होता (Chandrapur Daughter in law)

अनिश बेंद्रे

|

Apr 13, 2021 | 4:50 PM

चंद्रपूर : किरकोळ वादातून सासऱ्याने सुनेची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात हा प्रकार घडला. डोक्यात फरशी घालून सासऱ्याने सुनेला संपवलं. आरोपी सासऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Chandrapur Crime Father in law kills Daughter in law)

पैशांवरील वादातून डोक्यात फरशी घातली

पोंभुर्णा तालुक्यात चेक नवेगाव भागात सोमवारी रात्री ही घटना घडली. 32 वर्षीय गीता कन्नाके यांची हत्या करण्यात आली. रात्री पैशांवरुन सासरा-सुनेत वाद झाला होता. रागाच्या भरात आरोपी सासऱ्याने सुनेच्या डोक्यात फरशी घातली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सूनेचा मृत्यू झाला. या प्रकरणी 52 वर्षीय आरोपी भुजंग कन्नाके याला पोलिसांनी अटक केली आहे.

आंतरजातीय विवाहाच्या रागातून सुनेची हत्या

आंतरजातीय विवाह केल्यामुळे सासऱ्याने सुनेची हत्या केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी मुंबईतील कांदिवली परिसरात समोर आला होता. धक्कादायक म्हणजे हत्येनंतर महिलेचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला होता. आपल्या मुलाशी आंतरजातीय विवाह केल्यामुळे सासऱ्याचा सुनेवर राग होता. याच रागातून सासऱ्याने सुनेची हत्या केली.

विधवा सुनेची हत्या

विधवा सुनेच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून सासऱ्याने सून आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना जालन्यात घडली होती. सासऱ्याने ही हत्या अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रियकराने मृत्यूपूर्वी आईला खरी हकिगत सांगितली आणि सासऱ्याचं बिंग फुटलं.

जखमी अवस्थेत प्रियकराला रुग्णालयात नेलं जात होतं. त्यावेळी त्याने आईला सांगितलं की विकास बथवेल लालझरे याने मुद्दामहून आमच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर सुनेचा रुग्णालयात नेतानाच मृत्यू झाला होता. प्रियकराच्या आईच्या तक्रारीवर सासरा बथवेल आणि दुसऱ्या मुलाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

55 लाखांच्या सुपारीने तृतीयपंथीयाची हत्या, एकता जोशी हत्याकांडाचं गूढ सात महिन्यांनी उलगडलं

अंबाजोगाईचं जोडपं, अमेरिकेत घटना, त्या खुनाचं कोडं उलगडलं

(Chandrapur Crime Father in law kills Daughter in law)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें