AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपुरात गुन्हेगारी फोफावली, थेट जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचा जीव घेण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल शहरातील मध्यवर्ती बँकेच्या शाखेसमोर संध्याकाळच्या सुमारास संबंधित घटना घडली. आरोपी हा तोंडाला दुपट्टा बांधून आला होता. त्याने योग्य संधी साधत जिल्हा बँकेच्या अध्यक्षांवर गोळी झाडली.

चंद्रपुरात गुन्हेगारी फोफावली, थेट जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचा जीव घेण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत
| Edited By: Chetan Patil | Updated on: May 11, 2023 | 11:59 PM
Share

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी बतमी समोर येतेय. चंद्रपुरात अराजकतेची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय. अज्ञात आरोपीने संतोष रावत यांच्यावर गोळी झाडली. पण सुदैवाने रावत हे या हल्ल्यात बचावले आहेत. या हल्ल्यात त्यांच्या खांद्याला गोळी चाटून गेल्याची माहिती मिळत आहे. संबंधित घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल शहरातील मध्यवर्ती बँकेच्या शाखेसमोर संध्याकाळच्या सुमारास संबंधित घटना घडली. आरोपी हा तोंडाला दुपट्टा बांधून आला होता. त्याने योग्य संधी साधत जिल्हा बँकेच्या अध्यक्षांवर गोळी झाडली. मात्र या हल्ल्यातून सुदैवाने संतोष रावत बचावले आहेत. त्यांच्या खांद्याला गोळी चाटून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारने आल्याची आणि त्यातील एका आरोपीने गोळी झाडल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

संबंधित घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी संतोष रावत यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आलं. तर दुसरीकडे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तातडीने घटानस्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी हे फरार झाल्याने त्यांचा शोध घेणं हे पोलिसांपुढील ध्येय आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

रावत यांचे समर्थक आक्रमक

दरम्यान, या हल्ल्यामागे काही राजकीय कारण आहे का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. कारण मूल बाजार समितीच्या सभापतीची उद्या निवड होणार आहे. संतोष रावत यांच्याकडे 18 पैकी 18 सदस्यांचं बहुमत आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडीचा आणि हल्ल्याच्या घटनेचा काही संबंध तर नाही ना? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.

दुसरीकडे हल्ल्याच्या घटनेनंतर संतोष रावत यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी मूल-चंद्रपूर रस्ता जाम केलाय. संतोष रावत हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे या प्रकरणाला जास्त गांभीर्याने घेणं आवश्यक असल्याचं मत मांडलं जात आहे.

Follow Us
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या