येस बँक घोटाळा; राणा कपूर आणि गौतम थापर विरोधात आरोपपत्र दाखल

| Updated on: Sep 19, 2022 | 11:49 PM

आरोपींनी गुन्हेगारी कट, गुन्हेगारी विश्वासाघात, फसवणूक आणि सार्वजनिक पैशांचा वापर करण्यासाठी 466.51 कोटी रुपयांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

येस बँक घोटाळा; राणा कपूर आणि गौतम थापर विरोधात आरोपपत्र दाखल
गृहकर्ज मंजुर करुन घेत बँकेला गंडा
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : येस बँक घोटाळा (Yes bank Scam) प्रकरणी सीबीआयने सोमवारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर (Rana Kapoor) तसेच अवंथा समूहाचे प्रवर्तक गौतम थापर (Gautam Thapar) यांच्या विरोधात आरोपपत्र (Charge Sheet) दाखल केले. राणा कपूर आणि गौतम थापर यांच्या विरोधात 466.51 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

तापासादरम्यान राणा कपूर यांची भूमिका उघड

गेल्या वर्षी 2 जून रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये कपूर यांचे नाव संशयित म्हणून नव्हते, परंतु तपासादरम्यान घोटाळ्यातील त्यांची भूमिका समोर आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सीबीआयने सादर केलेल्या आरोपपत्रात थापर आणि ओबीपीएल यांची नावे

तपास एजन्सीने मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात या घोटाळा प्रकरणात थापर आणि ऑयस्टर बिल्डवेल प्रायव्हेट लिमिटेड (ओबीपीएल) यांचीही नावे समाविष्ट केली आहेत.

हे सुद्धा वाचा

तक्रार मिळाल्यानंत सहा दिवसांच्या आत एफआयआर नोंदवला

गेल्या वर्षी 2 जून रोजी, तत्कालीन मुख्य दक्षता अधिकारी आशिष विनोद जोशी यांच्याकडून तक्रार मिळाल्यानंतर, सीबीआयने थापर, ओबीपीएलचे संचालक – रघुबीर कुमार शर्मा, राजेंद्र कुमार मंगल आणि तापसी महाजन, अवंत रिअॅल्टी प्रायव्हेट लिमिटेड आणि झाबुआ पॉवर लिमिटेड यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता.

सार्वजनिक पैशाचा वापर केल्याचा आरोप

एजन्सीने सुमारे 15 महिन्यांच्या तपासानंतर विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र सादर केले आहे. केंद्रीय एजन्सीने आतापर्यंत अज्ञात व्यक्तींची भूमिका तपासण्यासाठी तपास खुला ठेवला आहे.

आरोपींविरोधात कोणते गुन्हे दाखल ?

या प्रकरणात, आरोपींनी गुन्हेगारी कट, गुन्हेगारी विश्वासाघात, फसवणूक आणि सार्वजनिक पैशांचा वापर करण्यासाठी 466.51 कोटी रुपयांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.