AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासह मावशीला कारने बेदरकारपणे उडवलं, सीसीटीव्हीत थरार कैद अन् पोलीस म्हणतात, अपघात इतका गंभीर नाही!

पिंपरी-चिंचवडमधील एका सोसायटीत झालेल्या अपघातात एका बाळ आणि त्याच्या मावशीला कारने उडवलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारचालकाची स्पष्ट चूक दिसून येत असतानाही, पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

बाळासह मावशीला कारने बेदरकारपणे उडवलं, सीसीटीव्हीत थरार कैद अन् पोलीस म्हणतात, अपघात इतका गंभीर नाही!
पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात
| Updated on: Jan 22, 2025 | 12:38 PM
Share

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये मे महिन्यात झालेल्या पोर्श अपघाताच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत बाईकस्वारांना चिरलडलं, त्यात दोघांचा मृत्यू झाला.याप्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले, त्याचा निकाल अजूनही लागलेला नाही, पण या घटनेवरून पोलीसांनी काहीच धडा घेतलेला दिसत नाही. कारण पुण्यापासून अवघ्या काहीच अंतरावर असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये असाच काहीसा अपघात झाला, त्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला तरीही पोलिस ढिम्मच आहेत. हा अपघात इतका गंभीर नाही असं त्यांचं म्हणणं असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

पिंपरी चिंचवडच्या सोसायटीत कारने बाळासह मावशीला उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये तो कैदही झाला. या घटनेमध्ये त्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तर त्याच्या मावशीला सुद्धा चांगलाच मार लागला आहे. मोशीच्या प्रिस्टीन ग्रीन सोसायटीत हा अपघात 16 जानेवारी रोजी झाला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल नाही.

अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

या अपघाताचे संपूर्ण दृश्य सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. ती दृश्यं पाहिल्यावर यात कार चालकाची चूक आहे, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची नक्कीच गरज नाही. मात्र जखमी मुलाच्या वडिलांनी यात माझ्याच मुलाची चूक आहे, तोच गाडीच्या समोर धावत आला, असं त्यांनी पोलिसांना लिहून दिलं असून त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. कदाचित मुलाच्या वडिलांवर दबाव आला असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. पण या घटनेते तो लहा मुलगा आण त्याची मावशी दोघेही गंभीर जखमी झालेत, अपघाताचे दृश्य समोर दिसत असूनही पोलिसांना हा अपघात गंभीर वाटू नये, ही खरी शोकांतिका आहे. पोलिसांनी सुमोटो कारवाई का केली नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे. पुण्यातील पोर्षे कार अपघातातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही धडा घेतला नसल्याचं यातून पुन्हा एकदा दिसून येतंय.

सीसीटीव्हीमध्ये काय दिसलं ?

सोसायटीच्या गेटमधून एक कार आत येते, तर एक लहान मुलगा आणि त्याची मावशी बाहेरच्या दिशेने जात असतात. मात्र आत आलेली ती कार अचानक वळली आणि समोरून चालत येणाऱ्या दोघांना जाऊन धडकली, त्यांना चाकाखाली अक्षरश: चिरडलं. ही घटना पाहून एकच कल्लोळ माजला,आजूबाजूच्या लोकांनी लगेचच त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल न झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.