Gujrat High Court : घटस्फोटानंतरही मुलांचा संपत्तीवरील हक्क कायम; गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय

| Updated on: Jul 17, 2022 | 10:24 PM

गुजरात उच्च न्यायालयात घटस्फोटाची दोन प्रकरणे दाखल होती. या प्रकरणांमध्ये भविष्यात वडिलांच्या संपत्तीत पहिल्या पत्नीच्या अल्पवयीन मुलांना हक्क मिळणार नाही, अशी अट वडिलांकडून घटस्फोटासाठी ठेवण्यात आली होती.

Gujrat High Court : घटस्फोटानंतरही मुलांचा संपत्तीवरील हक्क कायम; गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय
सुशिक्षित महिला विभक्त पतीकडे पोटगी मागू शकत नाही
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : वडिलांच्या संपत्तीवरील हक्काबाबत गुजरात उच्च न्यायालया (Gujrat High Court)ने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. पती-पत्नीचा घटस्फोट झाला तरीही मुलांचा वडिलांच्या संपत्ती (Property)वरील हक्क (Rights) कायम असल्याचं गुजरात उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. घटस्फोटाच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांवर सुनावणी करताना गुजरात उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर एखाद्या पुरुषाने दुसरे लग्न केल्यानंतर पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांना संपत्तीमध्ये अधिकार नाकारला जातो. मात्र गुजरात न्यायालयाच्या हा निकाल अशा प्रकरणांमध्ये दिशादर्शक ठरणार आहे.

घटस्फोटांच्या प्रकरणावर निकाल देताना न्यायालयाने फटाकरले

गुजरात उच्च न्यायालयात घटस्फोटाची दोन प्रकरणे दाखल होती. या प्रकरणांमध्ये भविष्यात वडिलांच्या संपत्तीत पहिल्या पत्नीच्या अल्पवयीन मुलांना हक्क मिळणार नाही, अशी अट वडिलांकडून घटस्फोटासाठी ठेवण्यात आली होती. याबाबत सुनावणी करताना न्यायालयाने वडिलांना फटकारले आहे. वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा अधिकार नसेल या अटीवर घटस्फोट घेता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. जरी वडिलांना दुसरा विवाह केला तरी त्यांच्या संपत्तीत पहिल्या पत्नीच्या मुलांचा अधिकार कायम असेल, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. या दोन्ही प्रकरणात जोडप्यांना घटस्फोट मंजूर केला आहे. मात्र वडिलांच्या संपत्तीत मुलांचा अधिकार नाकारण्याची अट अमान्य केली आहे. (Childrens right to property remains after parents divorce; Big decision of Gujarat High Court)

हे सुद्धा वाचा