मंदिराच्या वादातून तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न?, चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Mar 14, 2021 | 8:59 PM

चित्रा वाघ यांनी आज अहमदपूर तालुक्यातील किनगावात एका तरुणीसोबत झालेल्या अत्याचारावरुन राज्य सरकार आणि कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवलंय.

मंदिराच्या वादातून तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न?, चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्लाबोल
chitra wagh
Follow us on

मुंबई : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यावरुन भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सरकारविरोधात एकप्रकारे मोहीमच सुरु केली आहे. वाघ यांनी आज अहमदपूर तालुक्यातील किनगावात एका तरुणीसोबत झालेल्या अत्याचारावरुन राज्य सरकार आणि कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवलंय. किनगावात मंदिराच्या वादातून एका तरुणीला काही जणांनी बेदम मारहाण करुन तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. त्याबाबत वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.(Chitra Wagh criticizes Thackeray government for beating and try to raping a young girl)

Mpsc ची तयारी करणारी किनगाव अहमदपूरची तरूणी, गावातील भवानी मातेचं मंदिर पाडायला आलेल्या लोकांना मंदिर का पाडताय म्हणून तिनं विचारलं तर तिला घरात घूसून २ तास या लांडग्यांनी मारहाण केली. तिच्या सर्वांगावर चावे घेतले. तिच्या गुप्तांगात दगड टाकले. गळ्यावर कटर चालवायचा प्रयत्न केला. राज्यात झुंडशाही सुरू आहे का? असं ट्वीट करत वाघ यांनी सरकारला प्रश्न विचारलाय.

त्याचबरोबर ‘घरात घुसून मुलींना मारण्याची हिंमत होतेच कशी ?? अधिवेशनात महिला सुरक्षेवर सरकारचे भाषण ऐकून ४ च दिवस उलटले. बलात्काऱ्यांना अभय देण्याच्या सरकारच्या भुमिकेमुळेच हे हरामखोर माजलेत. ज्याची किंमत राज्यातील लेकीबाळींना मोजावी लागते. कुछ तो शर्म करो’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी अहमदनगरमधील घटनेवर तीव्र संताप व्यक्त केलाय.

नेमकं प्रकरण काय?

घरासमोरील देवीचं मंदिर पाडण्यासाठी काहीजण आले असता मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गावच्या सरपंचासह काही जणांनी मिळून मला मारहाण केली. माझा विनयभंग केला. इतकच नाही तर माझ्यावर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न झाल्या आरोप फिर्यादी तरुणीने केला आहे. याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात एकूण 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे हा अतिक्रमणाचा विषय आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी संबंधित तरुणी विरोध करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. अहमदपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

Chitra Wagh | चित्रा वाघ फोटो मॉर्फ प्रकरण, यवतमाळमधून एकाला अटक

चित्रा वाघ यांना पुन्हा धमकीचे फोन? लढा सुरुच राहणार असल्याचं ट्वीट

Chitra Wagh criticizes Thackeray government for beating and try to raping a young girl