Buldhana Crime : शेत रस्त्याचा वाद विकोपाल गेला, दोन कुटुंबात हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

शेतातील रस्त्याचा वाद विकोपाला गेला आणि गावात भलताच प्रकार घडला. क्षुल्लक वादातून दोन कुटुंब एकमेकांना भिडली.

Buldhana Crime : शेत रस्त्याचा वाद विकोपाल गेला, दोन कुटुंबात हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
बुलढाण्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 19, 2023 | 10:52 AM

बुलढाणा / 19 जुलै 2023 : शेतातील रस्त्यावरुन झालेला वाद विकोपाला गेला. मग दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाल्याची घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे. या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मारहाणीची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कुटुंबातील 13 जणांविरोधात मारहाण आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मारामारी करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे.

दोन कुटुंबात शेतातील रस्त्यावरुन जुना वाद

खामगाव तालुक्यातील आवार येथील नातेवाईक असलेल्या दोन कुटुंबात शेतातून जाण्याच्या रस्त्यावरुन जुना वाद आहे. दरम्यान एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबाच्या शेतातील रस्त्यावरुन बैलगाडी नेल्याने हा वाद झाला. माझ्या शेतातील रस्त्यातून बैलगाडी का नेली? असे विचारताच दोन्ही कुटुंबात वाद झाला. हळूहळू वाद विकोपाला गेला आणि दोन्ही कुटुंबे एकमेकांना भिडली.

दोन्ही कुटुंबातील 13 जणांविरोधात गुन्हा दाखल

या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या हाणामारीत महिलांचाही सहभाग होता. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. याबाबत दोन्ही कुटुंबियांकडून महिलांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या आहेत. यावरून 13 जणांविरुध्द हाणामारी, शिवीगाळ, धमकी आणि विनयभंग यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.