Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावंतवाडीच्या जंगलात बांधून ठेवलेल्या अमेरिकन महिलेने कागदावर असं काही लिहिलं जे वाचून पोलिसही हादरले

सावंतवाडी येथील एक जंगलामध्ये झाडाला बांधलेल्या अवस्थेत अमेरिकन महिला सापडली होती. गुराख्याला ती जंगलामध्ये दिसलेली पोलिसांनी तपास केल्यावर गेल्या 40 दिवसांपासून ती जंगलामध्ये असल्याचं तिने सांगितलं. अशक्त झाल्याने तिला बोलताही येत नव्हतं, कागदावर तिने लिहून पोलिसांनी माहिती दिली.

सावंतवाडीच्या जंगलात बांधून ठेवलेल्या अमेरिकन महिलेने कागदावर असं काही लिहिलं जे वाचून पोलिसही हादरले
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 5:09 PM

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत सापडली. अमेरिकन महिला नागरिक ललिता कायी कुमार एस हिला अधिक उपचारासाठी पोलीस बंदोबस्तात काल दुपारी गोवा बांबोळी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलीस तपासात अनेक गोष्टीचा उलगडा झाला असून तिच्याकडे सापडलेल्या मोबाईल आणि टॅबमधील माहिती मिळण्यासाठी सायबर विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात अमेरिकन दुतावासाने जलदगतीने तपास करण्याची विनंती भारत सरकारला केल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

अधिक तपासासाठी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेक्षणची दोन पोलीस पथके गोवा आणि तर सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक तामिळनाडू येथे रवाना करण्यात आली आहेत. तर याप्रकरणी महत्वाचा पुरावा ठरणाऱ्या मडुरा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्या असून त्यात ती कुठेही आढळून न आल्याने प्रकरणात अजून संदिग्धता वाढली आहे. जर तिला मडुरा स्थानकातून जंगलात आणले नसेल तर नेमके कुठून आणले याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

शनिवारी दुपारी तामिळनाडू येथील व मुळ अमेरिका येथील महिला रोणापाल जंगलात साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत गुराख्यांना आढळली. सावंतवाडी व बांदा पोलिसांनी या महिलेला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्ते यांच्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. गेले 40 दिवस ती उपाशी असल्याने बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. सुरुवातीला तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्यावर पतीने अत्याचार करून घातक आणि चुकीची औषधे दिली. तसेच याठिकाणी जंगलात आपल्याला बांधून ठेवल्याची माहिती दिली. अन्न न मिळाल्याने ती विदेशी महिला अशक्त बनली होती. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी सायंकाळी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र महिला प्रकृती अस्वस्थामुळे असंदीग्ध माहिती देत असल्याने पोलिसांसमोर माहिती मिळविण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

जंगलात सापडून आलेली अमेरिकन महिला ही उच्च शिक्षित असून ती योगाचे पुढील शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी भारतात तामिळनाडू येथे आली होती. त्यापूर्वी ती अमेरिकेत प्रसिद्ध बेली डान्सर आणि योग शिक्षक होती. मात्र ती तामिळनाडू येथून रोणापाल येथील जंगलात कशी पोहोचली याचा तपास करण्याचे आव्हान बांदा पोलिसांसमोर आहे.पोलीस अधिकारी मात्र याबाबत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क केला असता ते ही माध्यमांना बाईट देण्यास नकार देत आहेत.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.