
पत्नीवर असलेल्या संशयामुळे अनेक पतींनी तिची हत्या केल्याची प्रकरणे तुम्ही पाहिली असतील. आताही अशीच घटना तामिळनाडूतून समोर आली आहे. तुतीकोरिन येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका कॉन्स्टेबलने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि नंतर स्वतः आत्मसमर्पण केले. समोर आलेल्या माहितीनुसार त्याचा पत्नीवर संशय होता, या रागातून त्याने पत्नीचा शिरच्छेद केला आणि तिचे डोके शरीरापासून वेगळे केले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, पत्नीची हत्या करुन हा आरोपी थांबला नाही, तर त्याने स्वतः एका वृत्तवाहिनीवर जाऊन आपला गुन्हा कबूल केला आणि हत्येची माहिती दिली. तो म्हणाला की, ‘मी सर्वांना सांगू इच्छितो. मी माझ्या पत्नीची हत्या केली.’ त्याच्या या विधानानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
तुतीकोरिनच्या थलवैपुरम गावात ही घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी सेल्वन हा सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे उमा माहेश्वरी नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. सुरुवातीला त्यांचा सुखाने संसार सुरु होता. दोघांना दोन मुले आहेत. मात्र सेल्व्हन काही दिवसांपासून त्याच्या पत्नीवर संशय घेत होता.
तमिळ सेल्वनला आपल्या पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून या दोघांमध्ये 31 जुलै रोजी वाद झाला होता. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणात सेल्वनला राग अनावर झाला आणि त्याने पत्नीवर चाकूने हल्ला केला आणि तिचा गळा कापला. पत्नीची हत्या केल्यानंतर ते 9 वर्षांच्या मुलासह आणि 7 वर्षांच्या मुलीसह मामाच्या घरी गेला. तिथे मुलांना ठेवले आणि तो पळून गेलाय.
पत्नी माहेश्वरीची हत्या केल्यानंतर सेल्वन फरार झाला होता. मात्र हत्येच्या दोन दिवसांनंतर सेल्वन एका वृत्तवाहिनीवर पोहोचला. त्याने या चॅनेलवर पत्नीची हत्या केल्याची माहिती दिली. याबाबत तेनमपेटचे सहाय्यक पोलिस आयुक्त अरोकिया रवींद्र यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून सेल्वनला अटक केली. त्यानंतर आता त्याच्यावर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.