ऊसाच्या फडात गांजाची शेती; शेतकऱ्याचा प्रताप पाहून पोलिसांनी लावला डोक्याला हात

| Updated on: Oct 13, 2022 | 4:30 PM

पोलिसांनी थेट ऊसाच्या शेतावर धाड टाकली आणि गांजाचे पीक जमीनदोस्त केले. 

ऊसाच्या फडात गांजाची शेती; शेतकऱ्याचा प्रताप पाहून पोलिसांनी लावला डोक्याला हात
Follow us on

लातूर : गांजा लागवडीवर कायद्याने बंदी आहे. मात्र, अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गांजाची लागवड केली जात आहे. असाच एक प्रकार लातूर मध्ये उघडकीस आला आहे. येथे एका शेतकऱ्याने ऊसाच्या पिकाच्या आड गांजाचे पिक घेतले आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी थेट ऊसाच्या शेतावर धाड टाकली आणि गांजाचे पीक जमीनदोस्त केले.

लातूर जिल्ह्यातल्या डोंगरज येथील एका शेतात हे गांजाचे पिक आढळून आले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ ऊसाच्या फडात धाव घेतली.

यानंतर ऊसाच्या शेतीत शेतकऱ्याने गांजाची लागवड केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला . जवळपास दहा लाख रुपये किमतीची गांजाची झाडे या शेतकऱ्याने आपल्या ऊसाच्या पिकात लावलेली होती.

या प्रकरणी पोलिसांनी शेतकरी दशरथ कांबळे याला अटक केली आहे. याच्याकडून पोलिसांनी दहा लाखांचा मुद्देमाल देखील ताब्यात घेतला आहे.

कुणाला संशय येवू नये यासाठी शेतकऱ्याने ऊसाच्या पिकाआड गांजाची तब्बल 44 झाडे लावली होती. या झाडांची चांगली वाढ झालेली होती .

याची माहिती मिळताच पोलिसांनी थेट शेतावर जाऊन ही गांजाची शेती उद्धवस्त केली. आरोपीने ही शेती करण्यासाठी कुणाची मदत घेतली. हे पिक तो कुठे विकणार होता. याचा पोलिस कसून तपास करत आहेत.