High Court : वेश्यागमन करणारा ग्राहक अनैतिक देहव्यापारात दोषी नाही! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Calcutta HC : एनआरआय नागरिक असलेल्या सुरेश बाबू नावाच्या व्यक्तीला एका मसाज सेंटरमधून अटक करण्यात आलेली. सुरेश बाबू हे 4 जानेवारी 2019 रोजी एका मसाज सेंटरमध्ये गेलेले होते.

High Court : वेश्यागमन करणारा ग्राहक अनैतिक देहव्यापारात दोषी नाही! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या आरक्षण सोडतीला स्थगिती देण्यात आली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 7:47 AM

वेश्यागमन करणाऱ्या ग्राहकाबाबत एक महत्त्वपूर्ण निकाल हायकोर्टाने (High Court Historic Decisions) दिलाय. लैंगिक इच्छेशिवाय वेश्यागमन करणारा ग्राहक हा अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांसाठी जबाबदार ठरवला जाऊ शकत नाही, असा निकाल हायकोर्टाने दिलाय. कोलकाता हायकोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. 2019 रोजी दाखल करण्यात आलेल्या एका खटल्याप्रकरणी हा निकाल देण्यात आला. मसाज मार्लरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या सेक्स सेंटरवर पोलिसांकडून धाड टाकण्यात आली होती. या धाडीदरम्यान, एका पुरुषाला अटक (Police Arrest) करण्यात आलेली. या पुरुषानं हायकोर्टात दाद मागितली होती. त्यावर निकाल देताना कोलकाता हायकोर्टानं (Kolkata High Court) महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय.

नेमकं काय प्रकरण होतं?

एनआरआय नागरिक असलेल्या सुरेश बाबू नावाच्या व्यक्तीला एका मसाज सेंटरमधून अटक करण्यात आलेली. सुरेश बाबू हे 4 जानेवारी 2019 रोजी एका मसाज सेंटरमध्ये गेलेले होते. या मसाज सेंटरच्या आडून कुंटनखाना चालवाल होता. याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या मसाज सेंटरवर धाड टाकत आठ महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेतलं होतं. त्यात सुरेश बाबू यांचाही समावेश होता.

सार्वजनिक ठिकाणी वेश्या गृह चालवणं, व्यावसायिक हेतूनं लैंगिक शोषण आणि वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशांमधून उदरनिर्वाह करणं, अशा आरोपांखाली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सगळ्यांवर अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली होती. त्यानंतर खटलाही दाखल करत आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. याप्रकरणी सुरेश बाबू यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता.

हे सुद्धा वाचा

हायकोर्टात दाद..

दरम्यान, यानंतर सुरेश बाबू यांनी हायकोर्टात दाद मागितली होती. कोलकाता उच्च न्यायालयात त्यांनी दाद मागितलेली. यावेळी कोलकाटा उच्च न्यायायाने ग्राहक म्हणून गेलेल्या अर्जदाराचा कुंटणखाना चालवणं, अनैतिक व्यवहार आणि वेश्या वयवसायातून कमाईवर गुजराण करणं, या गुन्ह्यांशी कोणताही संबंध नसल्याचा निर्वाळा दिला. तसंच सुरेश बाबू यांना दोषमुक्तही करत त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हादेखील रद्द केलाय.

 Video : विधान परिषद निवडणुकीची मोठी बातमी

वेश्या व्यवसायातील ग्राहक गुन्हेगार नाही?

विशेष म्हणजे याआधी एप्रिल 2022 मध्ये कर्नाटक हायकोर्टाने आणि मे 2022 मध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टाने वेश्या व्यवसायातील ग्राहकाला अनैतिक व्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपी करता येणार नाही, असा निर्णय दिला होता. तसंच एखादा ग्राहक वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन देऊ शकतो आणि पैशांसाठी तिचं शोषणही करु शकत असला, तरी याबाबत कोणताही थेट आरोप आणि पुरावा नसताना ग्राहकाला दोषी मानता येणार नाही, असंही निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं होतं.

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.