Drug Smuggling | सात कोटी ड्रग्जची तस्करी, चक्क पोटात लपवल्या हेरॉईनच्या गोळ्या; बिंग नेमकं कसं फुटलं ?

त्याच्या पोटातून तब्बल 38 गोळ्या काढण्यात आल्या आहेत. ड्रग्ज तस्करीचा हा विचित्र प्रकार समोर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत 6.9 कोटी रुपये आहे.

Drug Smuggling | सात कोटी ड्रग्जची तस्करी, चक्क पोटात लपवल्या हेरॉईनच्या गोळ्या; बिंग नेमकं कसं फुटलं ?
अशा प्रकारे गोळ्या जप्त करण्यात आल्या.
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 7:19 AM

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशात ड्रग्ज तस्करीच्या (Drug Smuggling) मोठ्या घटना समोर आल्या आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करुन ही ड्रग्जतस्करी हाणून पाडलेली आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये (Delhi) तर एक अतिशय वेगळ्या पद्धतीने ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एकाला जेरबंद करण्यात आलंय. अटक करण्यात आलेला आरोपी हा युगांडा देशातील नागरिक असून त्याने तस्करीसाठी हेरॉईनच्या (Heroin) गोळ्या चक्क आपल्या पोटात लपवल्या होत्या. त्याच्या पोटातून तब्बल 38 गोळ्या काढण्यात आल्या आहेत. ड्रग्ज तस्करीचा हा विचित्र प्रकार समोर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत 6.9 कोटी रुपये आहे.

पोटात लपवल्या होत्या 38 गोळ्या

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर सीम शुल्क विभागाकडून युगांडा येथील नागरिकाकडून तब्बल 6.9 कोटीचे हेरॉईन हे ड्रग्ज पकडण्यात आले. जप्त करण्यात आलेले ड्रग्ज 998 ग्रॅम आहे. तर तस्कराकडून हेरॉईनच्या एकूण 91 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. युगांडा येथील एक नागरिक दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर उतरला होता. मात्र सीम शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. यामध्ये त्याच्या बॅगमधून हेरॉईनच्या 53 गोळ्या आढळल्या. यानंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची सखोल चौकशी केली. यामध्ये त्याने आपल्या पोटात 38 गोळ्या लपवल्याचे समोर आले.

आरोपी रुग्णालयात दाखल, उपचार सुरु 

दरम्यान,  ड्रग्ज लपवण्याच्या या आगळ्या वेगळ्या पद्धतीमुळे सगळेच आश्चर्यचकित झाले. युगांडा येथील या नागरिकाच्या पोटातून सर्व 38 गोळ्या काढण्यात आल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपीला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

इतर बातम्या :

MP: लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला, मित्र म्हणाले नाटक करतोय; वाचा पुढे नेमकं काय घडलं?

Satara : साताऱ्यात अंनिसने उतरवलं अंधश्रद्धेचं भूत, जनजागृती करीत महिलेच्या डोक्यावरील जटा कापल्या!

Latur Crime : लातूरमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याला धारदार हत्याराने भोसकले, हत्येचे कारण अस्पष्ट