सॉफ्टवेअर बनवून देतो म्हणत 40 लाख घेतले, नंतर धूम ठोकली, भाजप आमदाराच्या मुलाची फसवणूक

चोरटे हे कुणालाही सोडत नाहीत. एका भामट्याने तर कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांच्या मुलाची फसवणूक केली आहे.

सॉफ्टवेअर बनवून देतो म्हणत 40 लाख घेतले, नंतर धूम ठोकली, भाजप आमदाराच्या मुलाची फसवणूक
भाजप आमदार गणपत गायकवाड

कल्याण (ठाणे) : चोरटे हे कुणालाही सोडत नाहीत. एका भामट्याने तर कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांच्या मुलाची फसवणूक केली आहे. आमदारांच्या मुलाचे नाव प्रणव गायकवाड असं आहे. त्याची स्वत:ची एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. प्रणवची कंपनी शिक्षणासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची निर्मिती करत होती. या दरम्यान त्याची ओळख आशिषकुमार चौधरी नावाच्या तरुणासोबत झाली. त्याने प्रणवच्या सॉफ्टवेअर कंपनीत शिक्षणाकरीता सॉफ्टवेअर तयार करुन देण्याच्या नावाखाली 40 लाखांची फसवणूक केल्याती माहिती उघड झाली आहे. संबंधित प्रकार हा 2018 ते 2020 या कालावधी घडला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

भाजप आमदार गणपत गायकवाड यांची सॉफ्टवेअर कंपनी आहे. 2018 साली त्यांच्या विभागात राहणाऱ्या एका तरुणाने गुगलमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला, अशी माहिती समोर आली होती. ही माहिती मिळताच आमदार गायकवाड यांनी आशिष चौधरी या तरुणाचा सत्कार केला. आमदारांनी मुलगा प्रणव गायकवाड याच्या सॉफ्टवेअर कंपनीसाठी शिक्षणाकरीता लागणारे सॉफ्टवेअर तयार करण्याची जबाबदारी आशिष चौधरी याला दिली.

आशिष याने सांगितले होते की, या सॉफ्टवेअरचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होईल. त्याने दोन वर्षात तयार केले सॉफ्टवेअर काही विद्यापीठे आणि कॉलेज घेत आहेत असं भासविले. मात्र असे काही नव्हते. आशिष याने फेक आयडी आणि अॅग्रीमेंटचे कागद तयार केले होते. थोड्याच दिवसात आशिष हा पसार झाला.

आमदारांची पोलिसात तक्रार

आमदारांच्या लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आशिषचा शोध सुरु केला आहे. लवकरात लवकर आशिषला अटक करण्यात यावी. त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार गायकवाड यांनी केली आहे. तसेच आरोपीच्या सर्व डिग्री फेक आहेत, असेही त्यांनी सांगितले. आशिषच्या अटकेनंतर त्याने किती लोकांची फसवणू केली आहे हे उघड होणार आहे.

आमदार नेमकं काय म्हणाले?

“गुगलमध्ये तिसरा नंबर आला, असा गाजावाजा केला म्हणून मी त्याला सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम दिले. मात्र फसवणुकीनंतर माहित पडले की, त्याच्याकडे असलेली डिग्री फेक आहे. आशिष चौधरी याला अटक करुन त्याला शिक्षा दिली पाहिजे. नाही तर सुशिक्षित तरुणांवर लोकांचा विश्वास राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी दिली आहे (Bjp MLA Ganpat Gaikwad son cheated of Rs 40 lakh by a thief saying he makes education software).

हेही वाचा : 

ईडीची पहिली मोठी कारवाई, अनिल देशमुखांची 4 कोटींची संपत्ती जप्त

वाशी खाडी पुलावरुन आत्महत्येचा प्रयत्न, वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने तरुण बचावला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI