Dalit Female Teacher : धक्कादायक, दलित शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळले; दहाही आरोपी मोकाट

Dalit Female Teacher : अनिताचे पती ताराचंद यांनी अनिताला गावातील दहा लोकांनी जिवंत जाळल्याचा आरोप केला आहे. रामकरण, बाबूलाल, गोकुल, मूलचंद, सुरेशचंद, आनंदी, प्रहलाद रेगर (वॉर्ड पंच), सुलोचना, सरस्वती आणि विमला या आरोपींनी अनिताला जिवंत जाळल्याचा आरोप ताराचंद यांनी केला आहे.

Dalit Female Teacher : धक्कादायक, दलित शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळले; दहाही आरोपी मोकाट
घाटकोपरमधील कामराजनगरमध्ये रोड रोमियोला नागरिकांची बेदम मारहाण, अर्धनग्न अवस्थेत काढली धिंडImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 11:06 PM

जयपूर: एक दलित शिक्षिकेने (Dalit Female teacher)  हक्काचे पैसे मागितले म्हणून तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना जयपूरमध्ये (Jaipur ) घडली आहे. एक दोन नव्हे तर दहा जणांनी या शिक्षिकेला जिवंत जाळले. 10 ऑगस्ट रोजी जयपूरच्या रायसर गावात ही घटना घडली. ही शिक्षिका 70 टक्के भाजल्याने तिला येथील एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर तब्बल सहा दिवस उपचार करण्यात आले. सहा दिवस ही शिक्षिका (teacher ) मृत्यूशी झुंज देत होती. अखेर 16 ऑगस्ट रोजी तिचा जीवनाचा संघर्ष संपला. 16 ऑगस्ट रोजी या महिलेचा मृत्यू झाला. आज या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे जयपूर हादरून गेलं आहे. या घटनेवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

राजस्थान पत्रिकेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. अनिता रेगर असं या दुर्देवी शिक्षिकेचं नाव आहे. 10 ऑगस्ट रोजी अनिता सकाळी 8 वाजता तिचा मुलगा राजवीरसह बाजूलाच असलेल्या वीणा मेमोरियलला जात होती. याच शाळेत ती शिक्षिका होती. त्यावेळी रस्त्यात काही लोकांनी तिला घेरलं. आरोपींपासून बचाव करण्यासाठी अनिता बाजूच्या घरात घुसली. तिने मदतीसाठी 100 नंबरही फिरवला. पण पोलीस आली नाही. त्यानंतर आरोपींनी अनिताच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि तिला पेटवून दिलं.

व्हिडिओ व्हायरल, आरोपींची नावेही सांगितली

या घटनेची माहिती मिळताच अनिताचे पती ताराचंद आणि त्यांचे कुटुंबीय घटनास्थळी धावले. अनिताला जमवारामगडच्या सरकारी रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र, 70 टक्के भाजलेली असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना जयपूरच्या बर्न वॉर्डमध्ये हलविण्यात आले. रुग्णालयातील अनिताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ती झालेल्या घटनेची माहिती देताना दिसत आहे. यात तिने आरोपींची नावेही सांगितली आहेत.

जिवंत का जाळले?

ज्या आरोपींनी अनिताला जिवंत जाळले. त्यांना अनिताने अडीच लाख रुपये उसने दिले होते. ती बऱ्याच दिवसांपासून तिचे पैसे मागत होती. पैसे मागितले म्हणून यापूर्वी आरोपींनी अनिताला मारहाण केली होती. त्यामुळे या आरोपींविरोधात अनिताने 7 मे रोजी रायसर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता.

पोलिसांनी काय केले?

अनिताचे पती ताराचंद यांनी अनिताला गावातील दहा लोकांनी जिवंत जाळल्याचा आरोप केला आहे. रामकरण, बाबूलाल, गोकुल, मूलचंद, सुरेशचंद, आनंदी, प्रहलाद रेगर (वॉर्ड पंच), सुलोचना, सरस्वती आणि विमला या आरोपींनी अनिताला जिवंत जाळल्याचा आरोप ताराचंद यांनी केला आहे. मात्र, अजूनपर्यंत एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही. अनिताला जिवंत जाळल्या नंतर 12 ऑगस्ट रोजी अनिताचे कुटुंबीय डीजीपींना भेटले होते. यावेळी आरोपींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. मात्र, अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.