‘ती’ दीड वर्षापूर्वी सिक लिव्हवर गेली, पण परत आलीच नाही, महिला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह सापडला; मुंबईत धक्कादायक घटनेने खळबळ

महाराष्ट्र पोलिसांच्या महिला निरीक्षकाचा मृतदेह तिच्या भाड्याच्या घरात सापडला आहे. शीतल आडके असे 35 वर्षीय उपनिरीक्षकाचे नाव आहे. दीड वर्षांपासून ती सीक लिव्हवर होती.

'ती' दीड वर्षापूर्वी सिक लिव्हवर गेली, पण परत आलीच नाही, महिला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह सापडला; मुंबईत धक्कादायक घटनेने खळबळ
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 11:19 AM

मुंबई : कुर्ला नेहरू नगर पोलीस स्टेशनच्या नगर येथील एका महिला उपनिरीक्षकाचा (female police sub inspector) मृतदेह तिच्या भाड्याच्या घरात सापडला आहे. शीतल आडके असे या महिला उपनिरीक्षकाचे नाव आहे. तिची नियुक्ती फक्त नेहरू नगर पोलिस ठाण्यात होती, मात्र ती गेल्या दीड वर्षांपासून सिक लिव्हवर (on sick leave from 1 and half year) रजेवर होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आठवडाभरापूर्वी शीतलचा मृत्यू (death) झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतदेहातून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांना याची माहिती मिळाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतलने येथील कामगार नगर येथील शरद सहकारी संस्थेच्या पाचव्या मजल्यावर भाड्याचे घर घेतले होते. बुधवारी संध्याकाळी तिच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून सांगितले की तिच्या खोलीतून दुर्गंधी येत आहे. ही माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र दरवाजा आतून बंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करून दरवाजा तोडण्यात आला.

तेव्हा शीतलचा मृतदेह स्वयंपाकघरात पडून असल्याचे आढळून आले, तसेच तो वेगाने कुजूही लागला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतलचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. सध्या या प्रकरणी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिस झोन 6 चे डीसीपी हेमराज राजपूत यांनी सांगितले की, 35 वर्षीय उपनिरीक्षक शीतल आडके ही मूळची महाराष्ट्रातील असून तिचे अद्याप लग्न झालेले नाही. तिथे ती भाड्याच्या घरात राहत होती. मात्र आजारपणामुळे ती गेल्या दीड वर्षांपासून आजारी रजेवर (sick leave) होती. प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण वाटत असले तरी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजेल, असे त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....