मैत्रिणीला परीक्षेत मदत केल्याचा राग, तिघांचा तरुणावर चाकूहल्ला

| Updated on: Dec 10, 2021 | 11:59 AM

तिघे तरुण तुषारच्या शेजारी राहणाऱ्या तरुणीला धमकावण्यासाठी आले. यावेळी तुषारने त्यांना विरोध केला. त्यानंतर राहुल नावाच्या तरुणाने त्याच्या साथीदारांसह तुषारवर चाकूने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात तुषारच्या छाती आणि पोटावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला.

मैत्रिणीला परीक्षेत मदत केल्याचा राग, तिघांचा तरुणावर चाकूहल्ला
मिठाईच्या दुकानातील उकळत्या पाण्यात पडली चिमुकली
Follow us on

नवी दिल्ली : तिघा जणांनी एका तरुणावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. संबंधित तरुण आपल्या मैत्रिणीला परीक्षा काळात मदत करत होता, ही गोष्ट खटकल्यामुळे तिघा जणांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

पूर्व दिल्लीतील मधु विहार भागात ही घटना घडल्याची माहिती आहे. तुषार नावाचा तरुण त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणीला परीक्षेच्या वेळी मदत करत होता. तिला कॉलेजमध्ये नेण्या-आणण्याचं कामही तो करत होता. कारण काही टवाळखोर तिला त्रास देत होते.

चाकू हल्ल्यात तरुण जखमी

बुधवारी दुपारी तिघे तरुण तुषारच्या शेजारी राहणाऱ्या तरुणीला धमकावण्यासाठी आले. यावेळी तुषारने त्यांना विरोध केला. त्यानंतर राहुल नावाच्या तरुणाने त्याच्या साथीदारांसह तुषारवर चाकूने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात तुषारच्या छाती आणि पोटावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला.

जखमी तरुणाची मृत्यूशी झुंज

घटनेनंतर तुषारला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याची जीवन-मृत्यूशी झुंज सुरु आहे. आरोपी तरुणांना पकडून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर आरोपी राहुल आणि तरुणी यांच्यात आधीपासून मैत्री होती. मात्र तुषारशी मैत्री झाल्यापासून तरुणीने राहुलशी बोलणे बंद केले होते. त्यामुळेच राहुलला राग आला होता. या रागातून राहुलने साथीदारांसह तुषारवर चाकूने हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल आणि त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

संबंधित बातम्या :

Nagpur Video | कपड्यांवर पेट्रोलचे थेंब उडाल्याने वाद, पंपावरील महिला कर्मचाऱ्यांची तरुणीला मारहाण

Aurangabad: कर्नाटकातून आलेल्या हल्लेखोराने का केला हल्ला? कारण सांगण्यास पोलिसांचा नकार, डॉ. राफे खून प्रकरण!

Lady Police Suicide | 28 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, राहत्या घरी गळफास