Aurangabad: कर्नाटकातून आलेल्या हल्लेखोराने का केला हल्ला? कारण सांगण्यास पोलिसांचा नकार, डॉ. राफे खून प्रकरण!

Aurangabad: कर्नाटकातून आलेल्या हल्लेखोराने का केला हल्ला? कारण सांगण्यास पोलिसांचा नकार, डॉ. राफे खून प्रकरण!
प्रातिनिधिक छायाचित्र

7 डिसेंबर रोजी औरंगाबादमधील शासकीय कर्करोग रुग्णालयातील डॉ. अब्दुल राफे यांच्यावर घरात चाकूने प्राणघातक हल्ला झाला. यात ते गंभीर जखमी झाल्याने मृत्यूमुखी पडले. या प्रकरणी पोलीस तपास सुरु असून हल्ला नेमका का झाला, याचे कारण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Dec 10, 2021 | 10:23 AM

औरंगाबादः शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयातील डॉ. अब्दुल राफे अब्दुल कादीर यांच्यावर 7 डिसेंबर रोजी घरातच प्राणघातक हल्ला केला. पोट दुखण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले आणि त्याने पळ काढला. या हल्ल्यात डॉक्टरांचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेने औरंगाबाद हादरलं (Aurangabad murder) असून हा हल्ला नेमका का झाला, याचा पोलीस तपास घेत आहेत. तीन दिवसानंतर हल्लेखोर तरुण हा कर्नाटकातल्या गुलबर्गा येथून आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. किमान 400 किमी अंतर दुचाकीवर पार करून तो राफेंना जीवे मारण्यासाठी शहरात आला होता.

दुचाकी आणि हल्लेखोराची ओळख पटली

डॉ. राफे यांच्या चालकाने हल्लेखोराला ओळखले. चालकाच्या माहितीप्रमाणे, तो त्यांचा रुग्णालयातून पाठलाग करत होता. घटनेनंतर पोलिसांच्या पथकाने दुचाकी क्रमांक आणि फुटेजवरून शोध सुरु केला. त्यात हल्लेखोराची दुचाकी त्याच्या गुंडाप्पा नामक नातेवाईकाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याआधारे पोलीस हल्लेखोराच्या कुटुंबापर्यंत पोहोचले. त्यातून अनेक धागेदोरे हाती लागले. हल्ल्याची काही कारणेही समोर आली, मात्र पोलिसांनी ती जाहीर केलेली नाही. डॉक्टरांवर वार करताना हल्लेखोर ‘मेरी बहन को मारा’ असे म्हणत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रुग्णालय प्रशासनाकडून मात्र हल्ल्यासंबंधी काहीही माहिती मिळाली नाही.

काय घडलं त्या दिवशी?

डॉ. राफे हे मूळ नांदेडचे रहिवासी असून मागील तीन वर्षांपासून कॅनॉट परिसरातील सेंट लॉरेन्स हायस्कूलसमोर भाडेतत्त्वावर राहतात. सात वर्षांपासून ते कर्करोग रुग्णालयात आँकोलॉजिस्ट म्हणून काम करतात. 7 डिसेंबर रोजी ते संध्याकाळी चार वाजता घगरी आले आणि झोपले होते. साधरण पाच वाजेच्या सुमारास एक इसम पोट दुखण्याच्या बहाण्याने घरात आला. डॉक्टर त्याच्या बोलत असतानाच त्याने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

इतर बातम्या-

Nagpur MLC Voting | पक्षाची तटस्थ भूमिका, तरीही बसपचे दोन नगरसेवक मतदानाला, कोणाला मत देणार?

इंधनाचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें