पतीसोबत घटस्फोट, पुतण्याशी अवैध संबंध; असा झाला महिलेचा शेवट

महिला सद्दामला लग्नासाठी हट्ट करू लागली. सद्दामने तिला लग्नासाठी मनाई केली. परंतु, ती दबाव टाकत होती. त्यामुळं सद्दाम अडचणीत सापडला होता. त्यामुळं त्यानं महिलेला संपविण्याचं ठरविलं.

पतीसोबत घटस्फोट, पुतण्याशी अवैध संबंध; असा झाला महिलेचा शेवट
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 10:41 PM

नवी दिल्ली : झारखंडच्या (Jharkhand) गढवा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मृतक २३ वर्षीय महिलेचा पतीसोबत घटस्फोट झाला होता. महिलेचा खून केला गेल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. पोलिसांनी (police) गुन्हा दाखल करून तपास केला. शवविच्छेदनात महिलेच्या डोक्यावर घाव घातल्याचे स्पष्ट झाले. परंतु, अपघाताचा बनाव करण्यात आला होता. पोलिसांनी महिलेच्या घरी जाऊन तिचे सीमकार्ड ताब्यात घेतले. मोबाईलची माहिती काढण्यात आली. सीडीआरमधून महिलेच्या मृत्यूचे रहस्य उलघडले. सीमकार्ड महिलेच्या पतीचे नव्हते. ते पतीचा पुतण्या सद्दाम अंसारी याचे होते. २५ वर्षीय सद्दाम रंका ठाण्याअंतर्गत खरपो गावातील रहिवासी होता. पोलिसांनी सद्दामला ताब्यात घेतले.

सद्दाम अंसारीने सांगितले की, मृतक महिलेचे लग्न त्याचे काका हबीबबुल्ला यांच्याशी झाले होते. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. सद्दाम महिलेच्या प्रेमात पडला. तीसुद्धा काही दिवसांनी सद्दामच्या प्रेमात पडली. नातेगोते विसरून त्यांनी शारीरिक संबंध स्थापित केले.

लग्नासाठी करू लागली हट्ट

महिला सद्दामला लग्नासाठी हट्ट करू लागली. सद्दामने तिला लग्नासाठी मनाई केली. परंतु, ती दबाव टाकत होती. त्यामुळं सद्दाम अडचणीत सापडला होता. त्यामुळं त्यानं महिलेला संपविण्याचं ठरविलं.

भयाण वास्तव समोर

महिलेला बोलावून तिच्या डोक्यावर रॉडने वार केले. त्यानंतर तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून अपघाताचा बनाव केला. महिलेचा अपघातात मृत्यू झाला, असे त्याने दाखविले. पण, कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याचा तपास केल्यावर हे भयाण वास्तव समोर आले. पोलिसांनी आरोपी सद्दामला अटक केली. त्याला जेलमध्ये पाठविले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.