
काहीही झालं तरी, आपण सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घेतो. डॉक्टर म्हणजे देवाचा दुसरा रुप असं समजलं जातं. पण हेच डॉक्टर यम होतात तेव्हा…, डॉक्टर रुग्णांच्या मृत्यूसाठी जाबाबदार ठरत असतील तर…? डॉक्टरांवर देखील विश्वास कसा ठेवायचा… असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल.. अशात एका डॉक्टरचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. या डॉक्टरने कोणाचाच विचार केला नाही… 4 वर्षाच्या मुलापासून 89 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला देखील या डॉक्टरने मृत्यू दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरने आतापर्यंत 1 – 2 नाही तर, तब्बल 30 लोकांना औषधांच्या बदल्यात विष दिलं आहे, तर 12 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत…
पण डॉक्टारने स्वतःचे गुन्हे कबूल करण्यास नकार दिला आहे. त्याच्याकडे गुन्हेगार नसल्याचे सबळ पुरावे आहेत… असा दावा पोलिसांनी केला आहे. पण आरोप सिद्ध झाल्यानंतर डॉक्टरला जन्मठेप होऊ शकते.डॉ. फ्रेडरिक पेसियर याने 2008 ते 2017 या काळात पूर्वेकडील फ्रेंच शहरातील बेसनकॉन येथील त्यांच्या दोन क्लिनिकमध्ये हे भयानक काम करत होता. त्याचे गुन्हे अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नसल्यामुळे डॉक्टर मोकाट फिरत आहे.
आरोपांनुसार, डॉक्टर वर्षानुवर्षे रुग्णांना एनेस्थिशिया देण्याऐवजी विषाचे हाय डोस देत होता. जानेवारी 2017 मध्ये 36 वर्षीय रुग्ण सँड्रा सिमर्डला पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. महिलेची प्रकृती स्थिर होती. पण शस्त्रक्रियेनंतर अचानक तिच्या हृदयाचे ठोके थांबले. डॉक्टर पेशियर यांनी तिला एक इंजेक्शन दिलं, ज्यामुळे ती कोमात गेली. पण तिचा मृत्यू झाला नाही.
तपासात समोर आलं आहे की, वापरण्यात येणाऱ्या औषधांमध्ये 100 पट अधिक पोटॅशियम होतं. सत्य समोर आल्यानंतर स्थानिकांना मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वी 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीसोबत देखील असंच काही झालं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा त्यांना 2008 मध्ये 89 वर्षीय रुग्णाशी संबंधित असाच एक प्रकार उघडकीस आला. एकामागून एक, ओव्हरडोसचे प्रकरण समोर येऊ लागले.
डॉक्टरवर गुन्हा दाखल करणाऱ्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरला बदला घ्यायचा होता. म्हणून त्याने रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्यासाठी औषधांमध्ये छेडछाड केली. ज्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका आला किंवा त्यांचा मृत्यू झाला, त्यामध्ये एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे डॉक्टर फ्रेड्रिक… डॉक्टर फ्रेड्रिक याचे वडील देखील डॉक्टर होते आणि त्यांनी स्वतः अनेक वर्ष प्राक्टिस केली होती.
डॉक्टर स्वतःला निर्दोष असल्याचं सांगत आहे. दोषी आढळल्यास त्याला फ्रान्समध्ये जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.. असं देखील सांगण्यात येत आहे…