खान कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन, दुसऱ्यांदा बाप झालाय अरबाज!
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता अरबाज खान पुन्हा एकदा बाप झाला आहे. अरबाजने अद्याप ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना सांगितली नसली तरी, मीडिया रिपोर्ट्सनुसार शूराने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

Arbaaz Khan Sshura Khan: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अरबाज खान दुसऱ्यांदा बाप झाला आहे. अभिनेत्याची दुसरी पत्नी शूरा खान हिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. 4 ऑक्टोबर रोजी दुपारी, त्याची पत्नी शूरा खान हिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. दोघेही रुग्णालयात येताना दिसले आणि आता अरबाजने अखेर शूरासोबत त्याच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे.
अरबाजने अद्याप ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना सांगितली नसली तरी, मीडिया रिपोर्ट्सनुसार शूरा हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे… असं सांगण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी जून महिन्यात शूरा आणि अरबाज यांनी आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली होती.
View this post on Instagram
आनंद व्यक्त करत अरबाज खान म्हणालेला, ‘मी थोडा घाबरलेलो आहे आणि आनंदी देखील आहे. यावेळी सर्वांनाच चिंता वाटते. मी बऱ्याच वर्षांनी वडील होत आहे, म्हणून मी खूप उत्साहित आहे. मला हा आनं जबाबदारीची एक नवीन भावना देत आहे. मी बाळाची वाट पाहत आहे.’, आता अरबाज वयाच्या 58 व्या वर्षी बाबा झाल्याची माहिती समोर येत आहे.
अरबाज खान आणि मलायका अरोरा
अरबाजने 1998 मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला, पण दोघांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला.. 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मलायका आणि अरबाजला 2002 मध्ये जन्मलेला अरहान हा मुलगा आहे.
अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर मलायका हिचं नाव अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत जोडण्यात आलं. 2019 मध्ये दोघांनी नात्याची कबुली देखील दिली. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. मलायकापासून वेगळे झाल्यानंतर, अरबाजने मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करायला सुरुवात केली. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर अरबाज याने शूरा हिच्यासोबत दुसरं लग्न केलं.
