मुंबईतील डॉक्टरांवर ‘वेड’ फेम अभिनेत्री भडकली, म्हणाली, फॅन्सी क्लिनिक सुरू करण्याआधी…
Jiya Shankar: फॅन्सी क्लिनिक सुरू करण्याआधी..., 'वेड' फेम अभिनेत्रीला आलेला धक्कादायक अनुभव! मुंबईतील डॉक्टरांविषयी संताप व्यक्त करत म्हणाली, 'लोकांच्या आरोग्याशी खेळू नका आणि...'

Jiya Shankar: डॉक्टर म्हणजे देवाचा दुसरा रुप… असं आपण म्हणतो. कारण जेव्हा शरीर साथ देत नाही. अशा संकटकाळी डॉक्टरच धावून येतो आणि आयुष्याला नवसंजीवनी देतात. पण अशा अनेक घटना देखील समोर आल्या आहे. ज्यामुले अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. डॉक्टरांनी रुग्णाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला… अशा काही घटना देखील समोर आल्या आहेत. दरम्यान अभिनेत्री जिया शंकर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि डॉक्टरांवर संताप व्यक्त केला. अभिनेत्रीची पोस्ट सध्या तुफान चर्चेत आली आहे.
‘वेड’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या जिया हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्री डॉक्टरांवर संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘फक्त मुंबई नाही तर भारतातल्या डॉक्टरांना नक्की काय झालं आहे? माफ करा, पण सातत्याने नरकासमान अनुभव आल्यानंतर मला हे सगळं बोलावसं वाटत आहे. सर्वात आधीतर लोकांच्या आरोग्याशी खेळणं थांबवा आणि तुमचं फॅन्स क्लिनिक सुरु करण्यापूर्वी प्रॅक्टिस करा किंवा नावाजलेल्या रुग्णालयात नोकरी करण्यापूर्वी नीट शिक्षण घ्या आणि प्रॅक्टिस करा…’ असं अभिनेत्री संतापात म्हणाली आहे.

पुढे जिया म्हणाली, ‘मला डॉक्टरांबद्दल कितीही आदर असला तरी आताच्या काळात त्यांच्यावर विश्वास ठेवणं फार कठीण आहे.’ सांगायचं झालं तर, जिया हिला असा कोणता अनुभव आला आहे, ज्यामुळे तिचा डॉक्टरांवर विश्वास राहिला नाही… याबद्दल अभिनेत्रीने काहीही सांगितलेलं नाही. अभिनेत्रीने फक्त सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
जिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘वेड’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये देखील जिया दिसली. सोशल मीडियावर देखील जिया कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर जिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
