AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल चार्जर आणि पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात, अनेक धक्कादायक खुलासे समोर

Pahalgam Attack: 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. दहशतवाद्यांना रसद पुरवल्याबद्दल जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी मोहम्मद युसूफ कटारी याला अटक केली आहे. आरोपीने चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

मोबाईल चार्जर आणि पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात, अनेक धक्कादायक खुलासे समोर
फाईल फोटो
| Updated on: Oct 06, 2025 | 8:51 AM
Share

Pahalgam Attack: पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी जम्मू – कश्मीर पोलीस कसून चौकशी करत आहे. गेल्या महिन्यात अटक करण्यात आलेल्या मोहम्मद यूसुफ कटारी याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. 22 एप्रिल रोजी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कटारी जवळपास 4 वेळा भेटला होता. एवढंच नाही तर, त्याने दहशतवाद्यांना मोबाईल चार्जर देखील दिलेला. याच चार्जरमुळे कटारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. रविवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाममध्ये 26 जणांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या सुलेमान उर्फ ​​आसिफ, जिब्रान आणि हमजा अफगानी यांना महत्त्वपूर्ण रसद पुरवल्याच्या आरोपाखाली सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कटारीला अटक करण्यात आली होती.

दहशतवाद्यांना चार वेळा भेटला कटारी…

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कटारी हा फक्त 26 वर्षांचा आहे. चौकशी दरम्यान कटारी याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो श्रीनगर भागात तीन लोकांना चार वेळा भेटला होता. ऑपरेशन महादेवच्या ठिकाणाहून जप्त केलेल्या साहित्यांचं सखोल फॉरेन्सिक विश्लेषण आणि तपासानंतर त्याला अटक करण्यात आली.

एका चार्जरमुळे समोर आलं रहस्य

ऑपरेशन महादेव जुलै महिन्यात सुरु करण्यात आलं होतं. या ऑपरेशन दरम्यान, पहलगाम हत्याकांडात सहभागी असलेले तीन दहशतवादी मारले गेले. या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या अनेक वस्तूंमध्ये अँड्रॉइड मोबाईल फोनचा अंशतः खराब झालेला चार्जर आढळल्यानंतर पोलिसांनी कटारीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चार्जरच्या आधारावर पोलिसांनी चार्जरच्या मालकाचा शोध घेतला आणि त्याने एका डीलरला फोन विकल्याची माहिती दिली. याच माहितीच्या आधारावर पोलीस कटारी याच्यापर्यंत पोहोचले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कटारी हा विद्यार्थ्यांना शिकवत होता आणि दहशतवादी गटासाठी तो एक प्रमुख स्रोत होता. त्याने हल्लेखोरांना चार्जर पुरवून आणि कठीण मार्गावरून मार्गदर्शन करून मदत केल्याची माहिती समोर येत आहे.

चकमकीत तीन दहशतवादी खात्मा

पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सुलेमान उर्फ ​​आसिफ, जिब्रान आणि हमजा अफगाणी यांचा 29 जुलै रोजी ऑपरेशन महादेव अंतर्गत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे, ज्यांच्यावर दहशतवाद्यांना रसद पुरवणे आणि आश्रय देण्याचा आरोप आहे.

राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.