AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेपर्वाई जीवावर बेतली…डॉक्टरने व्हिडीओ कॉलवर नर्सकडून करून घेतले ऑपरेशन, गरोदर महिलेचा मृत्यू

डॉक्टर व्हिडीओ कॉलवर जशा सूचना देत होत्या त्याप्रमाणे नर्स ऑपरेशन करत होती. त्या महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला होता. मात्र त्यांना कुशीत घेण्यापूर्वीच.....

बेपर्वाई जीवावर बेतली...डॉक्टरने व्हिडीओ कॉलवर नर्सकडून करून घेतले ऑपरेशन, गरोदर महिलेचा मृत्यू
| Updated on: Jun 08, 2023 | 6:02 PM
Share

पाटणा : डॉक्टर शहराबाहेर असल्याने नर्सनी केलेले ऑपरेशन (nurse did operation) एका महिलेच्या जीवावर बेतले आणि तिची नवजात जुळी मुलं पोरकी झाली ! येथे एका डॉक्टरने व्हिडीओ कॉलद्वारे (सूचना देत) नर्सकडून गर्भवती महिलेचे ऑपरेशन केले. मात्र त्या दरम्यान त्या महिलेचा दुर्दैवी (woman died) मृत्यू झाला. तिने जुळ्या बाळांना जन्म दिला होता.

बिहारच्या पूर्णिया येथे हा धक्कादाक प्रकार घडला आहे. ही डॉक्टर पाटणा येथून व्हिडीओ कॉलद्वारे कनेक्टेड होती. ती तेथूनच हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सूचना देत होती.

खरंतर, मालती देवी या 22 वर्षीय गर्भवती महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. म्हणून सोमवारी तिला पूर्णियातील लाइन बाजारातील समर्पण प्रसूती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉ. सीमा कुमारी या स्त्री रोग विशेषज्ज्ञ शहराबाहेर गेल्या होत्या. मात्र त्यानंतरही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मालती देवी हिला ऑपरेशनसाठी दाखल करून घेतले. मालती हिला वेगाने, तीव्र कळा सुरू झाल्या होत्या. रुग्णालयातील नर्स व इतर कर्मचाऱ्यांनी डॉ. सीमा कुमारी यांच्याशी संपर्क साधला आणि प्रसूती करण्यासाठी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

नर्स करत होती ऑपरेशन

त्यानंतर त्यांनी मालती देवी हिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले व एका नर्सला बोलावले. व्हिडीओ कॉलवरून डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसार त्या नर्सने ऑपरेशन तर पूर्ण केले, मात्र नकळतपणे तिच्या कडून त्या गरोदर महिलेच्या पोटाची एक नस कापली गेली, ज्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत महिला मालती देवी हिने जुळ्या बालकांना जन्म दिला. त्यांच्यी प्रकृती स्वस्थ असल्याचे समजते.

या दुर्दैवी घटनेनंतर मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी मंगळवारी सकाळी रुग्णालयात गोंधळ घातला. रुग्णालयाबाहेर एकच गर्दी जमा झाली. त्यानंतर एसएचओ रंजीत कुमार हे टीमसह घटनास्थळी पोहोचले. पीडितेच्या कुटुंबियांकडून एक निवेदन मिळाले असून ते पूर्णियातील सिव्हिल सर्जनच्या कार्यालयात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येईल व बेपर्वाई करणारे डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.