Dombivali Crime : टीसीचे खोटे ओळखपत्र बनवले, दंडही वसुल करत होता, पण एक चूक नडली अन् पोलिसांच्या तावडीत सापडला !

| Updated on: Aug 26, 2023 | 8:58 AM

हल्ली फसवणूक करण्यासाठी आरोपी काय करतील याचा नेम नाही. अशीच एक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. एक 21 वर्षीय तरुण टीसी बनून प्रवाशांकडून पैसे वसूल करत होता. मात्र एक चूक नडली अन् पोलिसांच्या तावडीत सापडला.

Dombivali Crime : टीसीचे खोटे ओळखपत्र बनवले, दंडही वसुल करत होता, पण एक चूक नडली अन् पोलिसांच्या तावडीत सापडला !
डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडून तोतया पोलिसाला अटक
Image Credit source: TV9
Follow us on

डोंबिवली / 26 ऑगस्ट 2023 : इंटरनेटवर पाहून टीसीचे हुबेहूब ओळखपत्र बनवले. मग रेल्वेत रुबाबात टीसी बनून फिरणाऱ्या तोतयाला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय बहादूर सिंह असे तोतया टीसीचे नाव आहे. लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात दंड वसुली करत होता. मात्र त्याची एक चूक नडली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. आरोपीने आतापर्यंत दंडाच्या नावाखाली किती पैसे वसूल केले?, केव्हापासून तो हे सर्व करत होता? याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

काय आहे प्रकरण?

दिवा, कोपर, डोंबिवली स्थानकांच्या दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अवैधरित्या दंड वसुली सुरु होती. आरोपी दंडाच्या ठरल्या रकमेपेक्षा अधिक दंड प्रवाशांकडून वसूक करत होता. प्रवाशांकडून स्थानक प्रबंधक कार्यालयात टीसी दिलेल्या दंडापेक्षा अधिक दंड वसूल करत असल्याची तक्रार दाखल झाली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी दिवा स्थानकात पालत ठेवून टीसी बनून फिरणाऱ्या विजय सिंह या तरुणाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशी केली असता वियजयने आपल्याकडील ओळखपत्र दाखवले. यानंतर पोलिसांनी मुंबईतील मुख्य तिकीट निरीक्षक प्रमोद सरगईया यांच्याकडे विजय सिंह नावाच्या टीसीबाबत चौकशी केली. मात्र सरगईया यांनी अशा नावाचा कुणी टीसी नसल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच त्याच्याकडे असलेले ओळखपत्रही बनावट असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा

या बोगस टीसीने आतापर्यंत किती प्रवाशांची लूट केली? त्याने अशा पद्धतीने आणखी कुठे गुन्हे केले आहेत का? ओळखपत्र त्याने कुठून बनवून घेतले? या संदर्भात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी आणि तपास सुरू आहे.