भयंकरच… आई लग्नासाठी मुलगी शोधू शकली नाही, मुलाने उचललं टोकाचं पाऊल; जिने जन्म दिला तिलाच…

लग्नासाठी मुलगी शोधू शकली नाही या कारणावरून एका सनकी इसमाने रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या आईलाच...

भयंकरच... आई लग्नासाठी मुलगी शोधू शकली नाही, मुलाने उचललं टोकाचं पाऊल; जिने जन्म दिला तिलाच...
डोंबिवलीत कलाकाराला लुटले
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 12:33 PM

हैदराबाद | 25 ऑगस्ट 2023 : तेलंगणच्या (telangana) सिद्दीपेठ जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे एका 45 महिलेची तिच्याच पोटच्या गोळ्याने, मुलाने हत्या केल्याचे (crime news) धक्कादायक वृत्त आहे. त्यामागचे कारण ऐकून तर तुम्ही डोक्यालाच हात लावाल. आपल्या लग्नासाठी सुयोग्य मुलगी शोधू न शकल्याने या सनकी मुलाने त्याच्याच आईचा जीव घेतला. पोलिसांनी गुरूवारी ही माहिती दिली.

आरोपीने कबूल केला गुन्हा

तेलंगणच्या बांदा मेलाराम गावात बुधवार आणि गुरूवाच्या मध्यरात्री ही दुर्दैवी घटना घडली. वेंकटम्मा (वय 45) ही मृत महिला तिचा ईश्वर (वय 21) याच्यासोबत रहायची. तिच्या हत्येप्रकरणी तिचा मुलगा तसेच आणखी एका नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे. मृत महिलेच्या मुलीच्या तक्रारीनंतर याप्रकरणाचा तपास करण्यात आला असता आरोपी मुलगा आणि आणखी एका नातेवाईकाने त्यांचा गुन्हा कबूल केला.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

आरोपीने त्याच्या आईची वीट मारून- मारून हत्या केली व नंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिचा गळा चिरला आणि पायही कापले. मृत महिलेच्या मुलाने या सर्व घटनेला चोरीच्या उद्देशाने झालेली हत्या असे भासवण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले. ईश्वरने त्याच्या आईची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

आईवर टाकत होता दबाव

मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर हा दिव्यांग होता व लग्नासाठी मुलगी शोधावी यासाठी तो आईवर दबाव टाकत होता. मात्र तो दिव्यांग आणि बेरोजगार असल्याने त्याला कोणीच मुलगी देत नव्हते, त्यामुळे तो वैतागला होता. त्याचा आईवरही याच कारणामुळे राग होता आणि त्याने रागाच्या भरात हे कृत्य करत आईला संपवले. आरोपीने पोलिसांसमोर त्याचा गुन्हा कबूल केला.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.